काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या पालकांशी लष्कर व पोलिसांनी प्रथमच साधला संवाद, शांततेच्या दिशेने महत्वाचे पाउल

वृत्तसंस्था

श्रीनगर – दहशतवाद्यांच्या पालकांशी संवाद साधण्याचा उपक्रम लष्कर व पोलिसांनी प्रथमच हाती घेतला आहे. दहशतवादाला आळा घालायचा असेल तर त्याची सुरुवात घरापासून झाली पाहिजे. तसेच पाकिस्तानच्या चिथावणीला भुललेल्यांना दहशतवादापासून दूर केले पाहिजे असे नेहमी म्हटले जाते. त्या दिशेने लष्कराने आता निर्णायक पावले टाकण्यास सुरुवात केली आहेत. Army and police speaks with parents of terrorists

काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल येथील पोलिस व लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलले आहे.

दक्षिण काश्मी रमध्ये कार्यरत दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेऊन मुलांना मुख्य प्रवाहात परत आणण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.

श्रीनगरमधील लष्कराच्या १५ कॉर्पचे जनरल ऑफिसर कमांड अधिकारी लेफ्टनंट डी.पी. पांडे आणि आणि काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी संपूर्ण दक्षिण काश्मी रमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या पालकांची भेट शोपियाँ येथे घेतली. हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन पालकांनी मुलांना करावे, अशी विनंती या अधिकाऱ्यांनी केली. दहशतवाद सोडून घरी परतणाऱ्या युवकांचे स्वागत करण्याची व सर्व प्रकारचे साह्य पुरविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Army and police speaks with parents of terrorists

महत्त्वाच्या बातम्या