विशेष प्रतिनिधी
मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला. न्या. डी. ई. कोथळीकर यांनी तेलतुंबडे यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. तेलतुंबडे यांच्याविरोधात एनआयएकडे पुरेसे पुरावे आहेत, हा तपास यंत्रणेचा युक्तिवाद स्वीकारत न्यायालयाने तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार दिला.Anand Teltumbde’s bail application rejected by special court in urban Naxalism case
31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसंदर्भातला पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. या परिषदेच्या एक दिवसानंतर म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळच्या भीमा कोरेगावात जातीय दंगल उसळली.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते. मात्र राज्य सरकारने कोणतीही कारवाई करण्याआधीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहखात्याच्या अख्त्यारीत असलेल्या एनआयएकडे सोपवला होता.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तेलतुंबडे यांना एनआयएने अटक केली. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा व अन्य लोकांना देशाविरुद्ध युद्ध छेडण्यास चिथावल्याचा तपास यंत्रणेचा आरोप निराधार आहे. त्यात तथ्य नाही, असे तेलतुंबडे यांनी जामीन अर्जात म्हटले होते. तेलतुंबडे सध्या नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात आहेत.
एनआयएच्या वकिलांनी या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. तेलतुंबडे यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे, हे सिद्ध करण्यासाठी मौखिक व लेखी पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत. तेलतुंबडे हे सीपीआय (एम) चे सक्रिय कार्यकर्ते असून ते या संघटनेच्या उपक्रमांचा व कार्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करायचे, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले;
मात्र तेलतुंबडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले. पुरावे नसताना एनआयए आपल्यावर आरोप करत असल्याचे तेलतुंबडे यांनी अर्जात म्हटले होते.भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करणा राष्ट्रीय तपास यंत्रणेने 16 जणांना अटक केली आहे.
आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे या आठ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील स्टॅन स्वामी यांचा नुकताच मृत्यू झाला.
आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप आणि स्टॅन स्वामी हे सगळेजण माओवादी विचारसरणीच्या आणि सध्या बंदी असणाºया सीपीआय(माओवादी) या संघटनेचा प्रसार – प्रचार करत होते आणि सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात राग आणि असंतोष निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप या 10,000 पानी पुरवणी आरोपपत्रात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App