राहूल गांधी यांचे लाडके वेणुगोपाल यांचा फोन शरद पवारांनी दिला ठेऊन, म्हणून भिजत पडले विधानसभा अध्यक्षपदाचे घोंगडे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॉँग्रेसची संपूर्ण देशात अवस्था वाईट असली तरी अद्याप दरबारी राजकारण संपलेले नाही. त्यामुळे राहूल गांधी यांचे लाडके असलेले पक्षाचे सरचिटणिस के. सी. वेणुगोपाल यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला. मी वेणुगोपाल बोलतोय, विधानसभा अध्यक्षपदाचे काय करायचे, असे फोनवरच विचारले. तेव्हा काहीही न बोलता शरद पवार यांनी फोन ठेवून दिला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड होऊ शकली नाही. एवढ्या ज्येष्ठ नेत्यासोबत महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची ही कोणती पद्धत? असे म्हणत नंतर राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने हा सगळा प्रकार दिल्लीत सांगितला. Rahul Gandhi’s darling Venugopal’s phone was handed over by Sharad Pawar, thats why Assembly Speaker’s election postponed

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताना नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, ती का झाली नाही याचा उलगडा आता झाला आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणविल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्याशी स्वत: सोनिया किंवा राहूल गांधी यांनी चर्चा करण्याऐवजी पक्षाचा सरचिटणिस करतो याचा राष्ट्रवादीला राग आहे. या रागातूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही छोटा माणूस आहे, त्यांच्याबाबत बोलणार नाही असे म्हणत शरद पवार यांनी त्यांची टर उडविली होती. मात्र, नाना पटोले यांना सोनिया गांधी आणि विशेषत: राहुल गांधी यांनी वरदहस्त दिला आहे. एका अर्थाने राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेविरोधात रान पेटविण्यास मोकळीकच दिली आहे.कॉँग्रेसमध्ये एका बाजुला राष्ट्रवादी आणि शिवसेनेविरुध्द बोलण्याची अहमहिका लागली असताना काही नेते मात्र सत्ता जाईल या भीतीने अस्वस्थ आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ते म्हणाले, तीन पक्षांचे सरकार चालवताना वादाचे मुद्दे होत असतात. मात्र आघाडी सरकार स्थिर आहे. दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. तशीच पाच वषेर्ही पूर्ण होतील.

लोणावळा येथे भाषण करताना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. त्याचा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना दिले जातात, असा आरोप केला होता. त्यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली नाराजी योग्य शब्दांत दिल्लीपर्यंत पोहोचवली व त्यानंतर सूत्रे हलली.

यामुळे कॉँग्रेसने आता सामोपचाराची भूमिकाघेतलीआहे. पक्षाचे प्रभारी पाटील, बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे तिघे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची लवकरच भेट घेतील व याबद्दलची विस्तृत चर्चा करतील, असे म्हटले आहे.

Rahul Gandhi’s darling Venugopal’s phone was handed over by Sharad Pawar, thats why Assembly Speaker’s election postponed

महत्त्वाच्या बातम्या