भारताला नार्को टेररचा धोका, अंमली पदार्थांविरोधात लढण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : भारताला नार्को टेररचा धोका आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की आम्ही अंमली पदार्थांना देशात प्रवेश देणार नाही. आम्ही भारताला अमली पदार्थांचे केंद्र होऊ देणार नाही. हे थांबविणे फार महत्वाचे आहे ,असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.Union Home Minister Amit Shah’s appeal to India to fight narcotics threat

गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ड्रग्स आणि सायकोट्रॉफिक सबस्टंट्स फॉर रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस ऑ फ सेन्सर आॅफ एक्सलन्स फॉर एक्सप्रेसचे उद्घाटन शहा यांच्य हस्ते झाले. ते म्हणाले, अमली पदार्थांच्या दहशतवादासोबत लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा दुसऱ्या वेळी केंद्रात सरकार स्थापन झाले, तेव्हा हे केंद्र गुजरात फॉरेन्सिक विद्यापीठाला जोडले जाईल असा निर्णय घेण्यात आला होता. मला खात्री आहे की हे विद्यापीठ अन्य राज्यातही विस्तारले जाईल आणि युवकांना फॉरेन्सिक सायन्ससाठी योगदान देण्याची संधी मिळेल.

आम्ही सायबर डिफेन्स आणि बॅरिएट्रिक रिसर्चमध्ये स्वावलंबी होत आहोत. आज नार्को टेररचे आव्हान देशासमोर आहे. भारताला आणखी एक धोका आहे. त्याचे नाव नार्को टेरर आहे. आपल्याला गुन्हेगारी न्याय व्यवस्था उभारण्याची गरज आहे. फॉरेन्सिक सायन्स अशा कामात महत्वाची भूमिका बजावेल. कोणत्याही प्रकरणात तपासणी शक्य तितक्या वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असावी.

करोना लसीकरणाबाबत गुजरातमध्ये बऱ्याच समाजामध्ये शंका आहे. त्यांच्याकडे जाऊन आम्ही लस घेतली आहे हे सांगणे आमची जबाबदारी आहे, त्यांचा संकोच दूर करा. फक्त एकच गोष्ट आहे जी आपल्याला करोना संक्रमणापासून वाचवू शकते आणि ती म्हणजे १०० टक्के लसीकरण,असेही अमित शहा यांनी सांगितले.

Union Home Minister Amit Shah’s appeal to India to fight narcotics threat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात