आंदोलनजीवींनी रस्ते अडविल्यानेच दिल्ली ऑक्सिजनसाठी तडफडतेय, अमित मालविय यांचा आरोप

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. राजधानी ऑक्सिजन साठी अक्षरश: तडफडतेय. आज चारशे रुग्णांचे प्राण ऑक्सिजन वेळेवर पोहोचतोय की नाही या भीतीने कंठाशी आले होते. ऑक्सिजन पोहोचला परंतु विलंब झालाच. यामागे दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्याचे आंदोलन असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनी केला आहे. तरी दिल्लीचे मुख्यंमत्री या आंदोलनजीवींना पोसतेच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.Amit Malviya alleges that Delhi is struggling for oxygen as Aandolanjivis protesters block roads


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. राजधानी ऑक्सिजनसाठी अक्षरश: तडफडतेय. आज चारशे रुग्णांचे प्राण ऑक्सिजन वेळेवर पोहोचतोय की नाही या भीतीने कंठाशी आले होते.



ऑक्सिजन पोहोचला परंतु विलंब झालाच. यामागे दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यां चे आंदोलन असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनी केला आहे. तरी दिल्लीचे मुख्यंमत्री या आंदोलनजीवींना पोसतेच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमित मालविय म्हणाले, दिल्लीमध्ये सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. संपूर्ण देशातून ऑक्सिजन आणण्याची गरज आहे. मात्र, ऑक्सिजनचे टॅँकर येण्यास विलंब होत आहे. याचे कारण आंदोलनजीवी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे येणारे सर्व महामार्ग अडविले आहे. त्यांच्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.

ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब होत आहे.शेतकरी आंदोलनावर मालविय यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल या आंदोलनजीवींना पोसत आहेत,

असा आरोप मालविय यांनी केला आहे. दिल्ली संकटात लोटली गेली तरी चालेल पण केजरवाल यांच्या राजकारणापुढे पर्वा करत नाहीत.

Amit Malviya alleges that Delhi is struggling for oxygen as Aandolanjivis protesters block roads

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात