महाराष्ट्र हादरला : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर अर्धा तास बंद होता पुरवठा, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

11 patients die after oxygen leak in Nashik

Oxygen leak in Nashik : राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याची तक्रार केली जातेय, तर या गंभीर परिस्थितीत नाशकात ऑक्सिजनची गळती होऊन 22 जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखीही काही जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोलले जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान, अजूनही काही रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. WATCH: 11 patients die after oxygen leak in Nashik


वृत्तसंस्था

नाशिक : राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याची तक्रार केली जातेय, तर या गंभीर परिस्थितीत नाशकात ऑक्सिजनची गळती होऊन 22 जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखीही काही जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोलले जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान, अजूनही काही रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.

अर्धातास विस्कळित होता ऑक्सिजन पुरवठा

या घटनेबाबत सुरुवातीला माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, “ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व्ह लिकेज झाला होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाल्याने ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटवर असलेल्या 11 जणांचा मृत्यू झाला,” अशी माहिती स्थानिक प्रशानसनाने दिल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. परंतु टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होता. यादरम्यान 22 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लीक झालेला ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा होता.

रुग्णालयात 23 जण व्हेंटिलेटरवर

मनपा आयुक्तांनीही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ जण व्हेंटिलेटरवर आणि इतर ऑक्सिजनवर आहेत, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून तो टाकीत भरला जात असताना ही गळती सुरू झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.

WATCH: 11 patients die after oxygen leak in Nashik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात