कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल

Captain Cool Dhoni parents admitted to Ranchi hospital after Corona infection

Captain Cool Dhoni : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार धोनीचे आईवडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर रांची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या धोनीचे वडील पनसिंग आणि आई देविका देवी यांची प्रकृती ठीक आहे. ऑक्सिजनची पातळी अद्याप सामान्य आहे. फुप्फुसात संसर्ग पोहोचलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. सीटी स्कॅनद्वारे ही माहिती समोर आली आहे. Captain Cool Dhoni parents admitted to Ranchi hospital after Corona infection


विशेष प्रतिनिधी

रांची : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार धोनीचे आईवडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर रांची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या धोनीचे वडील पनसिंग आणि आई देविका देवी यांची प्रकृती ठीक आहे. ऑक्सिजनची पातळी अद्याप सामान्य आहे. फुप्फुसात संसर्ग पोहोचलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. सीटी स्कॅनद्वारे ही माहिती समोर आली आहे.

धोनी आयपीएलमध्ये बिझी

धोनीचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे आहे, त्याचे वडील पानसिंग 1964 मध्ये रांचीच्या मेकॉन येथे नोकरी मिळाल्यानंतर बिहारमध्ये स्थायिक झाले. हा भाग आता झारखंडमध्ये आला आहे. या कठीण काळात महेंद्रसिंह धोनी आपल्या कुटुंबासमवेत हजर नाही. सध्या तो आयपीएल खेळण्यात व्यग्र आहे. सध्या कोरोना विषाणूच्या भीतीमुळे बंद स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना आयपीएल सामने खेळले जात आहेत. आज धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

देशात 24 तासात तीन लाखांजवळ रुग्णांची नोंद

कोरोना विषाणूची दुसरी लाट प्राणघातक असल्याचे सिद्ध होत आहे. दररोजच्या मृत्यूंमध्येही मोठी वाढ झाली आहे. मागच्या 24 तासांत 2,94,115 नवीन रुग्णांची नोंद झाली. देशात एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह देशातील एकूण मृत्यूंचा आकडा वाढून 1,82,570 वर गेला आहे. तर आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 1,56,09,004 वर गेली आहे. देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21,50,119 पर्यंत पोहोचली. संसर्ग झालेल्या लोकांच्या एकूण संख्येपैकी हे प्रमाण 13.8 टक्के आहे.

Captain Cool Dhoni parents admitted to Ranchi hospital after Corona infection

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण