Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी


‘या’ दोन मार्गांवरून एकाच वेळी यात्रा सुरू होणार आहे.

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर :  जम्मू आणि काश्मीरमधील ६२ दिवसांची श्री अमरनाथ यात्रा यावर्षी १ जुलै रोजी सुरू होईल आणि ३१ ऑगस्ट २०२३ रोजी संपेल, असे केंद्रशासित प्रदेश सरकारने शुक्रवारी सांगितले. याशिवाय यात्रेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नोंदणी १७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. Amarnath Yatra 2023 to commence from July 1 registration starts from 17 April

पवित्र यात्रेच्या तारखांची घोषणा करताना, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की प्रशासन सुरळीत आणि त्रासमुक्त तीर्थयात्रा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

“पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची समस्यामुक्त तीर्थयात्रा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रशासन सर्व भाविक आणि सेवा प्रदात्यांना सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा पुरवेल. दूरसंचार सेवा त्यापूर्वी कार्यान्वित केल्या जातील ” यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी निवास, वीज, पाणी, सुरक्षा आणि इतर व्यवस्था यासारख्या सुविधा सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभाग समन्वयाने काम करत आहेत,” असे सिन्हा म्हणाले आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांवरून यात्रा एकाच वेळी सुरू होईल. उपराज्यापलांनी अधिकाऱ्यांना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत.

Amarnath Yatra 2023 to commence from July 1 registration starts from 17 April

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात