पंतप्रधान भाषण सुरू करणार त्या अगोदर घडला स्फोट, लोकांची प्रचंड पळापळ
विशेष प्रतिनिधी
वाकायाम : जपानच्या पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट झाला आहे. मात्र, पंतप्रधानांना तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जपानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, किशिदा यांच्याजवळ पाईपसारखी वस्तू फेकण्यात आली होती. या घटेनप्रकरणी पश्चिम जपानमधील वाकायामा येथील बंदरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. Massive explosion at Japanese Prime Minister Fumio Kishidas meeting
https://twitter.com/yukiko_070/status/1647068891536048128
या घटनेचा व्हिडिओ BNONE News या वृत्तवाहिनीने ट्विटरवर शेअर केला आहे. वाकायामा येथे जमलेले पहिले मीडिया कर्मचारी आणि इतर लोक भीषण स्फोट झाल्यानंतर धावताना दिसत आहेत. १९ सेकंदाच्या फुटेजमध्ये मीडीयाचे कर्मचारी आणि इतर लोक तिथून पळताना दिसत आहेत, ज्या ठिकाणी पंतप्रधान किशिदा असल्याचे वृत्त आहे. भीषण बॉम्ब स्फोटानंतर सर्वत्र धूर पसरला होता.
Japan PM Fumio Kishida evacuated after explosion at his speech venue Read @ANI Story | https://t.co/XmC6D4VY3L #Japan #JapanPM #FumioKishida #Wakayama pic.twitter.com/t8hw9YWqt9 — ANI Digital (@ani_digital) April 15, 2023
Japan PM Fumio Kishida evacuated after explosion at his speech venue
Read @ANI Story | https://t.co/XmC6D4VY3L #Japan #JapanPM #FumioKishida #Wakayama pic.twitter.com/t8hw9YWqt9
— ANI Digital (@ani_digital) April 15, 2023
भाषण सुरू होण्यापूर्वीच हा स्फोट झाला –
मीडियानुसार घटनास्थळी स्फोटासारखा आवाज ऐकू आला. पीएम फुमियो किशिदा लगेचच स्फोटाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी झाकून घेतले. घटनास्थळी जमलेले लोकही इकडे-तिकडे धावू लागले. पंतप्रधान त्यांचे भाषण सुरू करणार होते त्याआधीच वाकायामा शहरात स्फोट झाल्याचे वृत्त जपान टाइम्सने दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App