जाणून घेऊयात हा निळा रंग का आहे, भीमसैनिकांना इतका प्रिय?
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी अतिशय जल्लोषात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात आहे. या निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके काय समीकरण आहे, निळा रंग त्यांना का प्रिय आहे, बाबासाहेबांचे बहुतांश फोटो हे निळ्या रंगातील कोटामधील का असतात, झेंड्याचा रंग निळा का? आदी प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. Ambedkar Jayanti Why blue color is fevriot to Dr Babasaheb Ambedkar and his followers
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बहुतांश पुतळे, फोटो हे निळ्या रंगात असतात. शिवाय आंबेडकर जयंतीनिमित्त कित्येक वर्षांपासून निळ्या रंगाचे झेंडे, ‘जय भीम’ लिहिलेले निळे झेंडे, फलकसुद्धा आपल्याला दिसतात. आंबेडकर महासभेचे लालजी निर्मल यांनी या निळ्या रंगाच्या समीकरणाबाबत सांगितले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘दलित मित्र’ पुरस्कार प्रदान करणारे आंबेडकर महासभेचे लालजी निर्मल म्हणाले, “निळा रंग त्यांचा आवडता रंग होता आणि तो त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही वापरला.” तर, निवृत्त आयपीएस अधिकारी आणि प्रमुख दलित कार्यकर्ते एसआर दारापुरी म्हणाले की, ‘’निळा हा त्यांचा आवडता रंग असण्यासोबतच आंबेडकर शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने १९४२ मध्ये तयार केलेल्या पक्षाच्या ध्वजाचाही रंग होता.’’
याशिवाय दारापुरी म्हणाले, “ध्वजाचा रंग निळा होता आणि मध्यभागी अशोक चक्र होते. नंतर १९५६ मध्ये जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पूर्वीची पार्टी विसर्जित करून स्थापन करण्यात आली तेव्हा त्यालाही तोच निळा झेंडा देण्यात आला.” ते म्हणाले, “निळा आकाशाचा रंग देखील आहे, जो विशालतेचे प्रतीक आहे आणि ही बाबासाहेबांची दृष्टी होती.” बसपाने त्यालाच आपला रंग म्हणून स्वीकारले आहे आणि तेव्हापासून हा रंग दलित मुक्तीशी जोडला गेला आहे.’’
अलीकडेच बदाऊन गावात भगव्या जाकीटमध्ये दलित चिन्हाचा ५ फूट उंच पुतळा स्थापित करण्यात आला होता. परंतु हिंदुत्वाशी संबंधित रंग निवडण्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेचच निळ्या रंगात हा पुतळा पुन्हा रंगवण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App