अखिलेश यादव यांना झाली उपरती, आता म्हणे लस घेणार आणि इतरांनाही घ्यायला सांगणार

कोरोना प्रतिबंधक लसीला भाजपाची लस म्हणणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांन अखेर उपरती झाली आहे. आपण आता लस घेणार आहोत आणि इतरांनाही घ्यायला सांगणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.Akhilesh Yadav was overwhelmed, now he will take the vaccine and ask others to do the same


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : कोरोना प्रतिबंधक लसीला भाजपाची लस म्हणणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांन अखेर उपरती झाली आहे. आपण आता लस घेणार आहोत आणि इतरांनाही घ्यायला सांगणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

जानेवारी महिन्यात लसीकरण मोहीम सुरू झाली त्यावेळी अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पक्षाची म्हणजे भाजप लस असल्याचे म्हटले होते. त्यामुळे लस टोचून घेणार नाही असेही ते म्हणाले होते. आता मात्र, त्यांनी आपली भूमिका बदलली आहे.त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की जनआक्रोश पाहून केंद्र सरकारने लसीचे राजकारण बंद केले आहे. आता सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. आम्ही भाजपच्या लसीविरोधात होतो परंतु भारताच्या लसीचे स्वागतच करतो. त्यामुळे मी स्वत: लस घेणार आहेच पण कमतरतेमुळे लस घेत नसलेल्यांनाही घेण्याचे आवाहन करत आहे.

दोन जानेवारी २०२१ रोजी अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटले होते की आमचा भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. परंतु, कोरोनाविरुध्द टाळ्या-थाळ्या वाजविणाºया सरकारवर नाही.

कोरोनाकाळात ठप्प पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे आम्ही भाजपची राजकीय लस घेणार नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यावर सर्वांना मोफत लस देण्यात येईल.

मात्र, आता अखिलेश यादव यांनी आपली भूमिका बदलली आहे. अखिलेश यादव यांचे वडील माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनीही नुकतीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले होते की, समाजवादी पक्षाचे पालक असलेल्या मुलायमसिंह यादव यांचे स्वदेशी लस घेतल्याबद्दल धन्यवाद. यामुळे हे स्पष्ट झाले की अखिलेश यादव यांनी लसीबाबत केलेली वक्तव्ये अफवाच होत्या. त्याबद्दल अखिलेश यादव यांनी माफी मागायला हवी.

Akhilesh Yadav was overwhelmed, now he will take the vaccine and ask others to do the same.

महत्त्वाच्या बातम्या