आसामपाठोपाठ उत्तर प्रदेशातही लोकसंख्या नियंत्रण धोरण अमलात आणणार; मुख्यमंत्री योगींसमोर प्रेझेंटेशन


वृत्तसंस्था

लखनौ – उत्तर प्रदेशात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण तयार होते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समोर या बाबतचे एक प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. राज्याच्या नव्या लोकसंख्या नियंत्रण धोरणाचा आराखडा या प्रेझेंटेशनच्या आधारे तयार करण्यात येणार आहे. यामध्ये कुटुंब नियोजन आणि आरोग्य सुविधा यांच्यावर भर असेल. After Assam touched the chord, decisive leader CM Yogi reviewed population control policy proposal for UP.

आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी भाजप सत्तेवर येताच नव्या लोकसंख्या नियंत्रण धोरणाच्या अंमलबजावणीची सुरूवात केली. साधारण त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही हे धोरण अमलात आणण्यात येणार आहे.नव्या लोकसंख्या नियंत्रण धोरणानुसार उत्तर प्रदेशात २०२६ पर्यंत जन्मदर २.१ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात जन्मदर सध्या २.७ टक्के एवढा आहे. ही आकडेवारी राष्ट्रीय जन्मदराच्या २.२ टक्क्यांहून अधिक आहे. तर २०३० पर्यंत जन्मदर १.९ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी कुटुंब नियोजन आणि आरोग्य सुविधांवर भर दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांमुळे बालमृत्यू आणि मातृ मृत्यू दर कमी करण्यास मदत होणार आहे. यामुळे नियोजनाला चालना मिळणार आहे.

उत्तर प्रदेशाची लोकसंख्या २३ कोटी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशात लोकसंख्या १९ कोटी ९८ लाख १२ हजार ३४१ इतकी होती. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १६.५ टक्के लोकसंख्या ही उत्तर प्रदेशात आहे. यातील प्रयागराजमध्ये सर्वाधिक ५९ लाख ५४ हजार ३९१ एवढी लोकसंख्या आहे, तर महोबा प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच ८ लाख ७५ हजार ९५८ एवढी लोकसंख्या आहे.

After Assam touched the chord, decisive leader CM Yogi reviewed population control policy proposal for UP.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण