कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक तंगी आल्याने बंगाली टीव्ही मालिकांमधील प्रसिध्द अभिनेता सुवो चक्रवर्ती याने चक्क फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका मित्राच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने या अभिनेत्याचे प्राण वाचले.Actor attempts suicide by using Facebook live due to financial crisis, police find location and save his life
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक तंगी आल्याने बंगाली टीव्ही मालिकांमधील प्रसिध्द अभिनेता सुवो चक्रवर्ती याने चक्क फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका मित्राच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने या अभिनेत्याचे प्राण वाचले.
मंगल चंडी, मनसा अशा मालिकांमधून प्रसिध्द अभिनेता सुवो चक्रवर्ती गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये सुवो आपल्या अडचणी देखील सांगत होता. ही बाब त्याच्या मित्रांना वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या फेसबुक लाईव्हमध्ये अभिनेता सुवो चक्रवर्ती आपल्या अडचणी सांगत होता. प्रत्येक घरात या अडचणी असतात. माझी आई म्हणेल माझा मुलगा वयाच्या ३१व्या वर्षी देखील बेरोजगार आहे. माझ्या वडिलांचं गेल्या वर्षी निधन झाले आहे.
आम्ही आता त्यांच्या पेन्शनच्या पैशांवर गुजराण करत आहोत. जे निराश असतात, त्यांना जगावंसं वाटत नाही. मी हे फक्त दाखवण्यासाठी म्हणून करत नाही. मी हळूहळू झोपेच्या गोळ्या घेणार आहे, असे सांगत काही वेळाने सुवोनं फेसबुक लाइव्ह अचानक बंद केलं.
सुवो चक्रवतीर्चा हा फेसबुक लाइव्ह व्हिडीओ त्याचे अनेक चाहते बघत होते. आपले बोलणे सुरू असतानाच सुवो गोळ्या देखील खात होता. बोलणं झाल्यावर त्यानं अचानक फेसबुक लाईव्ह बंद केलं. हे पाहून चिंतेत पडलेल्या एका चाहत्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी लगेच सूत्र हलवून त्याच्या सध्याच्या लोकेशनचा ठावठिकाणा शोधून काढला. यासाठी पोलिसांनी फेसबुकची मदत घेऊन सुवो चक्रवर्तीच्या लाईव्ह लोकेशनची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच सुवोच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता सुवोची प्रकृती स्थिर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App