शादाब बटाटाने तोंड उघडलं, एनसीबीची धडक कारवाई ; ‘ या ‘ बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन उचललं

 • बिग बॉस फेम अभिनेता एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. Bollywood Actor Ajaz Khan arrested by NCB after Shadab Batata named in drug case

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिग बॉस फेम बॉलिवूड अभिनेता एजाझ खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतलं. राजस्थानहून मुंबईत पोहोचताच एअरपोर्टवर एजाझला ताब्यात घेण्यात आलंय . ड्रग्ज माफिया शादाब बटाटा याच्या चौकशीतून एजाझचं नाव उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयात नेऊन एजाझ खानची चौकशी केली जात आहे.

कोण आहे एजाझ खान?

 • एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे
  रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना यासारख्या मालिकांमध्येही अभिनय
 • बिग बॉसच्या सातव्या सिझनमुळे वादाच्या भोवऱ्यात
 • फिअर फॅक्टर- खतरों के खिलाडी, कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही सहभाग
 • एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्येही अटक
 • जुलै 2019 मध्ये धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला अटक केली. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटासह अन्य एकाला बेड्या ठोकण्यात आल्या. दोन कोटींपेक्षा जास्त किंमतीचे एमडी ड्रग्ज, एक फॉर्च्युनर, एक i20, आणि एक बलोनो अशा 3 कार जप्त केल्या आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली.एनसीबीने अटक केलेला शादाब हा मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्स माफिया फारुख बटाटा यांचा मुलगा आहे. मुंबईतील मोठे पब त्याचप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांना शादाब ड्रग्स सप्लाय करायचा असा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

शादाब बटाटा आणि शाहरुख खान एलियास उर्फ शाहरुख बुलेट (कोड नेम- बुलेट राजा) असे अटक केलेल्या ड्रग्स माफियांची नाव आहेत. शादाब बटाटा हा फारुख बटाटा यांचा मुलगा असून फारुख बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया आहे. एनसीबीने शादाबला मिरारोड येथून तर शाहरुखला वर्सोवा येथून ताब्यात घेतले. त्यावेळी शादाबच्या घरी 1.60 ग्रॅम MD, 61 मेफेड्रोनही जप्त करण्यात आले.

Bollywood Actor Ajaz Khan arrested by NCB after Shadab Batata named in drug case

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*