पहिल्याच पावसात शिवसेनेने मुंबई तुंबवून दाखवली


गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असणारी मुंबई दर पावसाळ्यात तुंबते. लोक अडकून पडतात. घरांमध्ये, दुकानांमध्ये, चाळींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरते. लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. पण सत्ताधारी शिवसेना पावसाळ्यातली मुंबईकरांची दैना कधीच दूर करत नाही. उलट मुंबई तुंबणार नसल्याचे म्हटलेच नव्हते, असे बेजबाबदार वक्तव्य शिवसेनेच्या महापौर करतात. Shivsena failed again in the first spell of Monsoon; Mumbai flooded


विशेष प्रतिनिधी

मुंबई : यंदा कधी नव्हे ते मॉन्सूनचा पाऊस मुंबईआधी पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर चोवीस तासांपूर्वी तो मुंबईत आला आणि पहिल्याच दिवशीच्या जोरदार पावसाने मुंबईकरांचे हाल सुरु झाले. बुधवारी दिवसभरात 220 मिलिमीटर पाऊस मुंबईत झाला.

या पावसासाठी ना मुंबईची महापालिका तत्पर होती ना राज्य सरकार. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून नालेसफाईची कामे होतात. मात्र हे कोट्यवधी रुपये भ्रष्टाचारात गिळले जात असल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे. त्यामुळेच पावसाळा आला की सर्वसामान्य मुंबईकरांना जीव मुठीत धरुन राहावे लागते.बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून साडेअकरापर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर दिवसभर सरी कोसळत राहिल्या. दिवसाअखेर मुंबईत 220.6 मिलीमीटर पाऊस नोंदला गेल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिली. कोसळत्या पावसामुळे मुंबईकरांना धडकी भरली. अनेक रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या होत्या. दुकाने, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. पश्चिम रेल्वे मार्ग रुळांवर पाणी आल्याने बंद पडला.

मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन दरम्यानच्या ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद पडली. पोटासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना धड घरी परतता येईना ना कार्यालय गाठता येईना. कारण जिकडेतिकडे पाणी आणि ट्रॅफिक जॅम होते. पावसाच्या वेगामुळे मुंबई विमानतळावरील वाहतूकही बाधित झाली होती.

दरम्यान, येत्या दोन दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. वेधशाळेने रायगडमध्ये गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. सह्याद्री घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जून दरम्यान पावसाचा इशारा आहे.गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १३ जून रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकणातही मुसळधार

मॉन्सूनचे आगमन झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर् मुसळधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत रत्नागिरीत 336.10 मिलिमीटर एवढ्या मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकणातील सर्वच गावे मॉन्सूनधारांनी चिंब झाली. पावसाचा वेग सगळीकडे दिवसभर टिकून होता.

विदर्भात मॉन्सून

कोकण किनारपट्टीला मॉन्सून झोडपून काढत असताना बुधवारी (ता. 9) विदर्भातही मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. मराठवाड्यात परभणी येथे अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.

Shivsena failed again in the first spell of Monsoon; Mumbai flooded

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय