विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : विजयनगर या बलाढ्य हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीचा मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केला होता. याच हंपीमध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास, वारसा, विश्वास, विज्ञान आपल्याला विश्वगुरु बनण्याकडे घेऊन जाण्याच्या ध्येयातूनच याचे आयोजन केले असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.A two-day international conference in Hampi, commemorating the Hindu capital destroyed by Muslim invaders
रेड्डी म्हणाले, मंदिरं हे भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचं प्रतिक आहेत. देशातील समृद्ध मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक इतिहास जपण्याची गरज आहे. हे संमेलन भारतीय मंदिर, कला आणि वास्तुकलेची भव्यता यवर चर्चा, विचारविनिमय आणि जगभरात या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे.
हे संमेलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समग्र दृष्टीकोनाशी अनुरुप आहे. जे आपल्याला पाच व्ही सोबत प्रेरित करतं. त्यात विकास, वारसा, विश्वास, विज्ञान आपल्याला विश्वगुरु बनण्याकडे घेऊन जातो, जेणेकरुन भारत जगाला मार्ग दाखवू शकेल.
केंद्र सरकारचे विकासाचे प्रयत्न गरीबातील गरीबापर्यंत पोहोचतील. आमचा अद्भुत वारसा भावी पिढ्यांना उपलब्ध होण्यासाठी त्याचे संरक्षण, जतन आणि प्रसार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार विश्वासानं काम करतं आणि आपल्या नागरिकांचा आणि जगाचा विश्वास जिंकतं. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपण आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करत आहोत, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला.
रेड्डी म्हणाले की, या भूमीतील मंदिरांकडे अनेक आयामांच्या माध्यमातून पाहिलं जावं. कारण, ही मंदिरं आत्म्याला आध्यात्मिक कल्याण, शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, स्थानिक समाजघटकांना आर्थिक संधी, शिल्पकार, कलाकार आणि कारागिरांना एक रचनात्मक मार्ग प्रदान करतो. हिंदू मंदिरे ही कला आणि विज्ञानाचे एक संयोजन असून त्यात शिल्पशास्त्र, वास्तू शास्त्र, ज्यामिति आणि समरुपता समाविष्ट आहे. मंदिरे ही एकता, अखंडता आणि सभ्यतेचं प्रतिक आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App