चक्क १४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात वेडी होऊन एका ३२ वर्षांच्या विवाहित महिलेने त्याला पळवूनच नेले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. दोघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.A 32-year-old married woman fell in love with a 14-year-old boy and took him away
रायपूर : चक्क १४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात वेडी होऊन एका ३२ वर्षांच्या विवाहित महिलेने त्याला पळवूनच नेले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. दोघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
छत्तीसगड राज्यातील कोरबामध्ये हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या महिलेला दोन मुले आहेत. मुलाच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना जांजगीर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करून तिला तुरूंगात पाठविले आहे.
या महिलेच्या पतीनेही पोलिसात पत्नी गायब असल्याची तक्रार नोंदवली होती. चौकशी दरम्यान दोघांच्याही मोबाईलमधून अश्लील फोटो जप्त केले आहेत. दादरखुर्द गावात राहणारी एक विवाहित महिला शेजारी राहणाºया 14 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली.
या दोघांमधील प्रेमप्रकरण इतके वाढले की, या दोन मुलांच्या आईने तिच्या अल्पवयीन प्रियकरासह पळून जाण्याची योजना आखली. 25 मे रोजी संधी पाहून दोघांनीही गावातून पळ काढला. जेव्हा महिलेचा नवरा घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की, त्याची पत्नी घरात नव्हती. त्यानंतर पतीने पोलिसांत पत्नी गायब असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी शोध सुरु केला असता समजले की, मुलगा जांजगीर जिल्ह्यातील नवागढ़ येथे आपल्या मामाच्या घरी आहे. याची माहिती मामानेच पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नवागढ़ गाठले आणि दोघांनाही मामाच्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मुलाने महिलेशी शारीरिक संबंध ठेवून तिच्याबरोबर पळून गेल्याची कबुली दिली
या प्रकरणात पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा केला आहे, महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला तुरूंगात पाठविण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App