9 सप्टेंबर 2001 या दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला म्हणजे दहशतवाद्यांनी महासत्तेला दिलेलं आव्हान होतं.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 11 सप्टेंबर (9/11 attack) रोजी 20 वर्ष पूर्ण. या हल्ल्याचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेच्या इतिहासात 9 सप्टेंबर ही तारीख कुणीही विसरु शकणार नाही. 9 सप्टेंबर 2001 साली अल कायदा या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात ट्विन टॉवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती, ज्या अमेरिकेच्या वैभवाची साक्ष होत्या, त्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावेळच्या एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेवर इतका मोठा हल्ला हा जगातील अनेक देशांच्या सुरक्षेची चिंता वाढवणारा होता. 9/11 AMERICA ATTACK: 3000 Deaths – The World Shakes – 20 years since the terrorist attack on the superpower; The CIA had the idea of attack – failed to plan; read more
अमेरिकेची सीआयए ही गुप्तचर संस्था जगातील सर्वात बलाढ्य व वेगवान गुप्तचर संस्थांमध्ये समाविष्ट हाेते. परंतु या संस्थेची आजवरची कामगिरी तसेच प्रतिमा 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कायमची डागाळली. हल्ल्याबाबत सीआयएला पूर्वीच कल्पना हाेती. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या गाेपनीय दस्तएेवजानंतर ही माहिती उघड झाली.
हल्लेखाेर अमेरिकेत असून सामान्य लाेकांप्रमाणे ते सर्वत्र भटकंती करत असल्याचेही सीआयएला ठाऊक हाेते. दहशतवादी हल्ल्याचीदेखील कल्पना आली हाेती. परंतु बेजबाबदारपणा किंवा अति आत्मविश्वास असल्यामुळे बहुदा वेळीच दक्षता घेऊन कारवाई झाली नसावी.
दहशतवाद्यांनी अमेरिकेची शान असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दाेन इमारती प्रवासी विमान घुसवून उडवून दिल्या. त्यात तीन हजारावर लोकांना प्राण गमवावे लागले. अमेरिकेच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या गाेपनीय फायली एफबीआयच्या आहेत. एफबीआय अमेरिकेचे अंतर्गत गुप्तचर संस्था आहे. त्यानुसार अल-कायदाचे दाेन दहशतवादी हानी हँजुर, नवफ अल-हाजमी जून 2001 मध्ये अमेरिकेला आले हाेते. दाेघांनी स्वत:ची आेळख न्यूजर्सीतील खासगी संस्थेचा कर्मचारी अशी सांगितली हाेती.
त्यांनी सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत फाेर्ट लीमध्ये मेल बाॅक्स क्रमांक-417 भाड्याने घेतला हाेता. त्यात दहशतवादी हल्ल्याच्या कटाबाबतचे पत्र, इतर सामग्री सातत्याने येत हाेती. त्यांनी बँक खातेही सुरू केले. . ते सगळे अमेरिकी समाजातील खुलेपणाचा फायदा घेऊन तेथे राहिले. भटकले. फिरण्यासाठी कार भाड्याने घेतली. सामान्य लाेकांप्रमाणे लंच-डिनर, मनाेरंजन, जिम, खरेदी सगळे केले. साेबतच हल्ल्याची तयारीही करत राहिले. परंतु त्यांचा काेणाला संशय आला नाही. त्यांनी स्वत:ची आेळख लपवली नव्हती.
सीआयएला दहशतवाद्यांच्या कारवाया व त्यांच्या कटाबद्दलही माहिती हाेती. परंतु त्यांना दहशतवाद्यांच्या या कारवाया आग्नेय आशियातील संभाव्य हल्ल्यांसाठी असाव्यात, असा अंदाज सीआयएने लावला हाेता. राॅसिनी यांच्या म्हणण्यानुसार 9/11 च्या काही आठवडे आधी सीआयएला हल्ला अमेरिकेतच हाेणार असल्याचा पूर्ण अंदाज आला. एफबीआयला माहिती मिळाली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 11 सप्टेंबर रोजी 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यीत जवळपास 3 हजार जणांचा मृत्यू झाला तर 25 हजार जण जखमी झाले होते. अमेरिकेत झालेला हा हल्ला लाखो लोकांनी पाहिला. तसंच त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजवर समोर आले आहेत. आता या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अमेरिकन गुप्तचर संघटनेनं (American Secret Service) आजवर कधीही न पाहिलेले फोटो शेअर केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App