विशेष प्रतिनिधी
मुंबई : चिमुंबई : चित्रपट क्षेत्राचे माहेरघर म्हणजे मुंबई. मुंबईला बाॅलीवूडचे असे म्हटले जाते. मुंबई मायानगरीच्या इतिहासात अविस्मरणीय नोंद व्हावी असा फिल्मी स्टार्सचा क्रिकेट सामना झाला होता.सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर आले होते. २८ जानेवारी १९६२ रोजी झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात राजकपूर आणि दिलीपकुमार यांच्या नेतृत्वाखालचे संघ खेळले. दोन्ही संघांमध्ये चुरस झाली होती. या ऐतिहासिक सामन्याला २८ जानेवारीला, कालच ६० वर्षे पूर्ण झाली. 60 years to the historic match of Film Stars Rajkapur and Dilip Kumar were in the team
हा सामना राज कपूर यांच्या टीमने जिंकला. परंतु दिलीप कुमार आपल्या मित्राच्या विजयामुळे आनंदी होते. यात मेहमूद, प्राण, शम्मी आणि शशी कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. मनोज कुमार, राजेंद्र कुमार, नंदा या कलाकारांनाही चांगला क्रिकेट खेळ केला. खासकरुन कर्णधार म्हणून दिलीप कुमार आणि राज कपूर संपूर्ण सामन्यात आपल्या टीमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत होते.
सामन्यात दिलीप कुमार यांनी राज कपूर यांच्या गोलंदाजीवर शानदार चौकार ठोकले होते. कॉमेडियन आयएस जोहर आणि जॉनी वॉकर यांनीही आपल्या स्टाईलने सर्वांना हसवले. सामन्याचे समालोचन राज मेहरा केले होते. प्राण, जीवन आदी तसेच अनेक नट्या आणि नवे जुने कलावंत सामना पाहण्यासाठी आले होते. आजही या सामन्यातील क्षणचित्रे, ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ चित्रण गूगलवर उपलब्ध आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App