खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी; करणाऱ्याला ठाण्यातून केली अटक


विशेष प्रतिनिधी

ठाणे :- खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्याला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. pengolin Smuggler arrested from Thane

ठाण्यातील वागळे ईस्टेट परिसरातील २२ नंबर सर्कल येथे एक जण वन्यप्राणांच्या अवयवांची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने २६ जानेवारी रोजी सायंकाळी सापळा लावून एका संशयितास ताब्यात घेतले. किरण परशुराम धनवडे असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे.त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका बॅगेत दुर्मिळ सस्तन प्राणी खवले मांजराचे साडे पाच किलो खवले त्याच्याकडे आढळून आले. चौकशीत हे खवले १२ लाख रुपयात विकण्यासाठी आणल्याचे उघडकीस आले. हे खवले कोण खरेदी करणार होते व अटकेतल्या आरोपीने ते कोठून आणले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

pengolin Smuggler arrested from Thane

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय