देशात साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेचे, अमित शाह यांनी मानले आभार


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : देशात गेल्या साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेला आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आभार मानले आहेत.उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वृंदावनला भेट दिली. त्यांनी बांके बिहारी मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेत पूजा केली.Amit Shah thanked the people of Uttar Pradesh for the change that has taken place in the country in the last seven and a half years

अमित शाह म्हणाले, मी या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचे हात जोडून आभार मानतो. निवडणुका २०१४ च्या असो, २०१७ त्या असो किंवा २०२२ च्या, इथले नागरिक कायमच भाजपाला भरघोस मते देतात. मी या जनतेला सांगू इच्छितो की गेल्या साडेसात वर्षांत देशात आणि उत्तर प्रदेशात जो बदल घडला आहे त्याचं सगळं श्रेय उत्तर प्रदेशातल्या महान जनतेला जाते.

  

उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या सरकारांनी केवळ जातिवाद आणि परिवारवादाला प्राधान्य दिलं. भ्रष्टाचार त्यांच्या काळात बोकाळला, असा आरोपही शाह यांनी केला. ते म्हणाले, योगी आदित्यनाथ यांच्या काळात दरोडे ७० टक्क्यांनी तर चोºया ७२ टक्यांनी कमी झाल्या आहेत.

बांके बिहारी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी आसपासच्या बाजारातल्या लोकांना भाजपाला मत देण्याचं आवाहनत्यानंतर ते मथुरेकडे रवाना झाले. मथुरेत पोचल्यावर अमित शाह यांनी घरोघरी जाऊन मतं मागण्याच्या मोहीमेला सुरूवात केली.

त्यानंतर अमित शाह यांनी प्रभावी मतदाता संवाद या कार्यक्रमांतर्गत उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मी २०२२ च्या निवडणुकांमध्ये मथुरेतल्या सगळ्या भाजपा उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी मतं मागण्यासाठी आलो आहे. मथुरेचं भव्य दिव्य रुप तिला पुन्हा मिळवून देणं हाच आमचा संकल्प आहे.

Amit Shah thanked the people of Uttar Pradesh for the change that has taken place in the country in the last seven and a half years

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी