रेपो रेटमध्ये 50 बेसिस पाॅईंटची वाढ; गृह, वाहन कर्ज पुन्हा महागले; मध्यमवर्गीयांना फटका!!


वृत्तसंस्था

मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 5 बेसिस पाॅईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 % गेला आहे. 50 basis points increase in repo rate

RBI ने रेपो दरात वाढ केल्याने, गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज जर वाढवल्याने, बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते.

एकाच महिन्यात 90 बेसिस पॉईंटची वाढ 

याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या माॅनिटरी पाॅलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पाॅईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 % होता. त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पाॅईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर रेपो दर 4.90 % झाला आहे. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पाॅईंटची वाढ केली होती.

50 basis points increase in repo rate

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात