उत्तराखंडमधील जलप्रलयात मरण पावलेल्यांची संख्या पोचली ४६ वर


विशेष प्रतिनिधी

डेहराडून – उत्तराखंडमधील जलप्रलयात मरण पावलेल्यांची संख्या ४६ वर पोचली असून आणखी अकरा जण बेपत्ता आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितले.46 peopels died in Uttarakhand due to rain

अतिवृष्टीमुळे रानीखेत आणि अल्मोडा येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून या दोन्ही भागांचा राज्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नैनीताल येथे अडकून पडलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी तब्बल दीड हजारांपेक्षाही अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम केले आहे.



येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच अवधी लागेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य सरकारकडून जिल्हा पातळीवर पुनर्वसनासाठी प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीच्या वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पाऊस थांबला असून पुढील आठवडा कोरडा जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन वित्तहानी झाली आहे.

46 peopels died in Uttarakhand due to rain

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात