पोटनिवडणूकीसाठी उतावीळ ममता वळल्या हिंदुत्वाकडे; समर्थकांनी त्यांचे साकारले दुर्गा रूप; नवरात्रात उत्सवात अनेक मूर्तींची विक्री


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक घेऊन विधानसभेत पोहोचल्याशिवाय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गत्यंतर नाही. कारण त्या सध्या आमदार नाहीत. भाजपचे नेते हिंदू अधिकारी यांनी नंदिग्राम मधून त्यांचा पराभव केला आहे. अशा स्थितीत या तीनच महिन्यांमध्ये त्यांना पोटनिवडणुकीत निवडून येण्याशिवाय पर्याय नाही. या पोटनिवडणूकीवर डोळा ठेवून ममता बॅनर्जी पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्या आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यांचे दुर्गा रुप साकारले आहे. 3 committees collaborate to make idol of Goddess Durga resembling CM Mamata Banerjee

अजून दीड महिन्यांनी देवी नवरात्र येणार आहे. या नवरात्रात पश्चिम बंगालमध्ये दुर्गेची पूजा करण्यात येते. नेमकी त्याच वेळी ममतांच्या भवानीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. अशावेळी त्यांच्या प्रचारासाठी दुर्गा रुप उपयोगी ठरू शकते म्हणून त्यांची दुर्गा रूपातली मूर्ती साकारण्यात आली आहे.

कोलकत्याच्या नजरूल पार्क उन्नयन समिती आणि एक कला केंद्र यांनी एकत्र येऊन ममता दुर्गा मूर्ती साकारण्याचे उपक्रम सुरू केले आहेत. २.५० लाख रूपये किंमतीच्या या मूर्ती असतील, असे दीपन्वित बागची यांनी सांगितले. या प्रकारे अनेक मूर्ती साकारण्यात येणार असून मूर्तीचा चेहरा ममतांचा करण्यात आला आहे. तसेच मूर्त्याच्या दहा हातांमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या दहा योजनांचा लेखाजोखा सादर करणारी पत्रके देण्यात आली आहेत. जेणेकरून ममता दुर्गा आपल्या सेवेसाठी कशा मग्न आहेत हे जनतेला कळावे.

विधानसभेच्या निवडणुकीत ममतांनी आपण कायस्थ ब्राह्मण असल्याचे सांगितले होते. त्या ठिकठिकाणी जाऊन मंदिरांमध्ये महाआरत्या करीत होत्या. आपल्यावरचा मुस्लिम लांगूलचालनाचा आरोप खोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यात काही प्रमाणात यशस्वी झाल्या. आता भवानीपूरच्या पोटनिवडणूकीत त्यांची प्रतिमा पश्चिम बंगालमध्ये दुर्गा रूपात साकारून ममता स्टाईल हिंदुत्वाचा नवा अध्याय लिहिला जात आहे.

3 committees collaborate to make idol of Goddess Durga resembling CM Mamata Banerjee

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात