बेसुमार विकास येतोय चीनच्या मुळावर, सततच्या पावसामुळे प्रचंड महापुर, दीडशेवर बळी


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची मोडतोड करून केला जाणारा बेसमार विकास यांची चांगलीच फळे आता चीनला भोगावी लागत आहे. चीनमध्ये गेल्या हजार वर्षांत झाला नाही इतका मुसळधार पाउस यंदा झाला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे. 150 peoples died in china due to flood

चीनच्या हेनान प्रांतात होणाऱ्या पावसामुळे आलेल्या पुराने आतापर्यंत दीडशेहून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत. तसेच किमान पाचशे जण बेपत्ता झाले असून त्याचा तपास सुरू आहे.



हेनान प्रांताच्या सरकारने म्हटले की, पूरग्रस्त भागातील सुमारे ६.७ लाख नागरिकांना वाचविण्यात आले तर सुमारे ९.२ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. काही भागातील पाणी कमी झाले असले तरी अनेक ठिकाणी स्थिती वाईटच आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्य आणि स्वच्छता मोहीम वेगाने राबवली जात आहे.

रस्ते व कारखानदारी वाढवण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व डोंगर सपाटीकरण केले जात आहे. त्याचे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत.

150 peoples died in china due to flood

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात