कच्छच्या सीमेवर तब्बल पंधरा हजार कोटींचे हेरॉईन जप्त, अफगाणी नागरिकांचा हात


विशेष प्रतिनिधी

भूज – गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आलेल्या २ हजार ९८८.२१ किलोग्रॅम वजनाच्या हेरॉइनची किंमत ही तब्बल पंधरा हजार कोटी रुपये एवढी भरली आहे.15 thousand crore heroine seized in Gujrat

याप्रकरणी अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी या भागांत छापे घालण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये काही अफगाणी नागरिकांचा हात असल्याची बाब उघड झाली आहे.



एम. सुधाकर आणि त्याची पत्नी दुर्गा वैशाली यांच्या मालकीच्या अशी ट्रेडिंग कंपनीने हे हेरॉइन भारतामध्ये आयात केले होते. या दाम्पत्याला डीआरआयने चेन्नईतून अटक केली असून त्यांना कच्छ येथे आणण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने या दोघांनाही दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक किलोग्रॅम हेरॉइनची किंमत ही तब्बल पाच कोटी रुपये एवढी असते. हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून येथे आणण्यात आल्याचे कळल्यानंतर ‘डीआरआय’ने कारवाईचा बडगा उगारला होता.

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे नोंदणी असलेल्या एका कंपनीने हे अमली पदार्थ मागविले होते. अर्धवट प्रक्रिया झालेले हे पावडरचे टणक गोटे आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ते गुजरातेतील मुंद्रा बंदरात आणण्यात आल्याचे उघड झाले आहे.

15 thousand crore heroine seized in Gujrat

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात