२६/११ हल्ला “हिंदू दहशतवाद” दाखवून हिंदूंना खचविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते!!; माजी ‘रॉ’ अधिकाऱ्यांकडून पोलखोल


प्रतिनिधी

मुंबई : 26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित होता, हे आता कुठे लोक बोलायला लागले आहेत. 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला हा “हिंदु दहशतवाद” दाखविण्याचे काँग्रेसचे षडयंत्रच होते. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून राहण्याची काँग्रेसची योजना होती, असे परखड प्रतिपादन भारतीय रक्षा विशेषज्ञ, संशोधन आणि विश्लेषण शाखा अर्थात रॉचे माजी अधिकारी आणि भारतीय सेना अधिकारी कर्नल आर. एस. एन. सिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘26/11 मुंबई दहशतवादी हल्ला : काँग्रेसचे हिंदूविरोधी षडयंत्र !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. 100The 26/11 attacks were a conspiracy of the Congress to expose Hindus by showing “Hindu terrorism

कर्नल आर. एस. एन. सिंह पुढे म्हणाले, की आपण गेल्या 1400 वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्त्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर हल्ले होतच राहणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला आणि जिहादी विचारधारेला नेस्तनाबूत करण्याची गरज आहे. काँग्रेसची सत्ता असताना 2004 ते 2008 या कालावधीत दिल्ली, वाराणसी, अयोध्या, जयपूर, भाग्यनगर (हैद्राबाद), मुंबई, पुणे, मालेगाव आदी विविध ठिकाणी पाकिस्तानातील आयएसआय गुप्तहेर संघटनेने भारतात बसलेल्या राजकीय नेत्यांच्या साहाय्याने बाँबस्फोट घडवून आणले आणि मुंबई येथील 26/11 चा दहशतवादी हल्ला हा त्याचा कळस बिंदू होता. जेणेकरून हे सांगता यावे की, मुंबई येथील 26/11 यासह मालेगाव, समझोता एक्सप्रेस हा ‘हिंदू दहशतवाद’ होता’.

तुकाराम ओंबळेंमुळे काँग्रेस विफल

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर.वी.एस. मणि म्हणाले, की ‘तत्कालीन राजकीय नेत्यांकडून योग्य हस्तपेक्ष झाला असता, तर 26/11 चा हल्ला रोखला जाऊ शकला असता! मात्र तसे झाले नाही. “हिंदू दहशतवाद” एक भ्रम होता, 26/11 चा हल्ला हा याचा एक भाग होता. त्यानंतर याविषयी लिहिली गेलेली पुस्तके हा ‘हिंदू दहशतवाद कसा होता, हे सिध्द करण्यासाठी होती; मात्र आता जनतेसमोर सत्य उजेडात आले आहे. तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडल्याने 26/11 चा दहशतवादी हल्ला हा ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचे त्यांना सिध्द करता आले नाही.

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक म्हणाले, ‘तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले, अन्यथा हिंदू दहशतवाद सिध्द करण्याची काँग्रेसची स्क्रिप्ट तयार होती. हिंदूंनी तुकाराम ओंबळेचे बलिदान कधीही विसरू नये. काँग्रेसने कधीही अस्तित्त्वात नसलेला ‘हिंदू दहशतवाद’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताचे पुन्हा विभाजन टाळायचे असेल, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हिंदू राष्ट्राची मागणी केली पाहिजे. हिंदूंनी अजूनही सतर्क राहून देशविरोधी शक्तींविरोधात संघटित झाले पाहिजे.

100The 26/11 attacks were a conspiracy of the Congress to expose Hindus by showing “Hindu terrorism

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण