धक्कादायक : कोविशील्डचे 10 हजार डोस गायब, जबलपूरच्या ज्या खासगी रुग्णालयाच्या नावाने खरेदी ते अस्तित्वातच नाही!

10 Thousand Doses Of Covishield Purchased By Fake Private Hospital Missing in Jablapur

Covishield : मध्य प्रदेशात कोव्हिशील्ड लसीचे 10,000 डोस (एक हजार कुप्या) गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे जबलपूरमधील ज्या मॅक्स हेल्थ केअर हॉस्पिटलच्या नावावर लसीचे डोस खरेदी केले होते, ते हॉस्पिटलचे प्रत्यक्षात तेथे अस्तित्वात नाही. जिल्ह्यात नियुक्त लसीकरण अधिकारी सांगतात की, जबलपूरमध्ये या नावाचे रुग्णालय असल्याची माहिती नाही. या रुग्णालयाचे दोन दिवस शोध घेण्यात आला, परंतु ते काही सापडले नाही. अशा परिस्थितीत आता कोव्हिशील्ड लस कोणी विकत घेतली आणि आता ही लस कोठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 10 Thousand Doses Of Covishield Purchased By Fake Private Hospital Missing in Jablapur


जबलपूर : मध्य प्रदेशात कोव्हिशील्ड लसीचे 10,000 डोस (एक हजार कुप्या) गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे जबलपूरमधील ज्या मॅक्स हेल्थ केअर हॉस्पिटलच्या नावावर लसीचे डोस खरेदी केले होते, ते हॉस्पिटलचे प्रत्यक्षात तेथे अस्तित्वात नाही. जिल्ह्यात नियुक्त लसीकरण अधिकारी सांगतात की, जबलपूरमध्ये या नावाचे रुग्णालय असल्याची माहिती नाही. या रुग्णालयाचे दोन दिवस शोध घेण्यात आला, परंतु ते काही सापडले नाही. अशा परिस्थितीत आता कोव्हिशील्ड लस कोणी विकत घेतली आणि आता ही लस कोठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मध्य प्रदेशातील एकूण सहा खासगी रुग्णालयांनी थेट सीरम संस्थेकडून कोव्हिशील्ड लसीची खरेदी केली आहे. यात जबलपूर, भोपाळ आणि ग्वाल्हेरमधील प्रत्येकी एक आणि इंदूरमधील तीन खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. राज्यातील सर्व 6 खासगी रुग्णालयांनी एकूण 43 हजार डोस खरेदी केले आहेत. यामध्ये मॅक्स हेल्थ केअर संस्थेने जबलपूरच्या नावावर 10 हजार डोस विकत घेतले आहेत. एका कुपीमध्ये 10 डोस असतात.

मेसेज मिळाल्यावर प्रकरण आले चव्हाट्यावर

शत्रुघ्न दहिया यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी लसीकरण अॅपवर एक संदेश आला आहे. यात जबलपूरच्या मॅक्स हेल्थ केअर संस्थेला 10 हजार डोस देण्याची माहिती मिळाली. ते म्हणाले की, जेव्हा त्यांनी या रुग्णालयाचे नाव पहिल्यांदा पाहिले आणि ऐकले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. दोन दिवसांपासून जबलपूरमधील या रुग्णालयाची नोंदी आदींचा शोध सीएमएचओमार्फत घेण्यात आला. परंतु या नावाचे रुग्णालय रेकॉर्डमध्येदेखील आढळले नाही. भोपाळच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

षडयंत्रामुळ सतर्कता

डॉ. दहिया म्हणाले की, भोपाळच्या अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत की, काही समाजकंटकांनी किंवा खासगी रुग्णालयाने एखाद्या कटानुसार तर हे केले नाही, याची चौकशी केली पाहिजे. या लसीचा गैरवापर किंवा डंप करण्याच्या शक्यतेबाबत अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासह सीरम इन्स्टिट्यूटकडूनही या रुग्णालयाबद्दल तपशील मागवण्यात आला आहे.

लसीची लाखोंची किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, कराराअंतर्गत खासगी रुग्णालयांना प्रति डोस 600 रुपये द्यावे लागतात. अशा परिस्थितीत 10 हजार डोसच्या बदल्यात 60 लाख रुपये दिले गेले असतील. आता प्रश्न असा आहे की, एवढी मोठी रक्कम टाकणार्‍या रुग्णालयाने बनावट पत्ता का लिहिला असेल? जिल्हा लसीकरण अधिकारी शत्रुघ्न दहिया यांच्या म्हणण्यानुसार जबलपूर ते भोपाळ आणि दिल्लीच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या रुग्णालयाबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही.

10 Thousand Doses Of Covishield Purchased By Fake Private Hospital Missing in Jablapur

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण