लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी २७.६९ लाख लोकांना लस! केंद्रांची संख्या १९ हजारांनी वाढली


लसीकरणामध्ये भारत दररोज नवीन विक्रम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून आजपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी २७.६९ लाख लोकांना लस देण्यात आली.2.7 million people were vaccinated on the first day of the vaccination festival


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लसीकरणामध्ये भारत दररोज नवीन विक्रम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून आजपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी २७.६९ लाख लोकांना लस देण्यात आली.

लसीकरण उत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेक कंपन्यांच्या कार्यस्थळावर लसीकरण केंद्रे उघडण्यात आले होती. आत्तापर्यंत देशात ४५ हजार लसीकरण केंद्रे दररोज सुरू होती. मात्र, उत्सवासाठी त्यामध्ये वाढ करण्यात आली. तब्बल ६३,६०० केंद्रे आज सुरू होती. याठिकाणी लसीचे २७.६९ लाख डोस तयार ठेवण्यात आले होते.



रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत देशातील १० कोटी ४३ लाख ६५ हजार ०३५ लोकांनचे लसीकरण पूर्ण झाले. यामध्ये ९० लाखांवर आरोग्य कर्मचारी आहेत. त्यापैकी ५५ लाखांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

फ्रंटलाइॅन वर्कर्सची लसीकरण झालेल्यांची संख्या ९९ लाख ९४ हजार असून त्यापैकी ४७ लाख ९३ हजार जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील ३ कोटी १९ लाख ४९ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

६ कोटी ७६ लाख लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे. साठ साठ वर्षांवरील वर्षांवरील चार कोटी चार लाख लोकांनी पहिला डोस तर १९ लाख ३७ हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण सुरू झाल्याचा आजचा ६८ वा दिवस होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना महात्मा फुले जयंतीपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत देशात लसीकरण उत्सव करण्याचे आवाहन केले होते. यानिमित्ताने लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की लसीकरण उत्सव हे कोरोना विरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात आहे.

आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेवर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लसीचा एकही डोस वाया जाऊ देऊ नका, असं आवाहन केलं आहे. आपल्याला झिरो वॅक्सिन वेस्टेजपर्यंत पोहोचायचं आहे. ज्यांना लसीची आवश्यकता आहे त्यांना लस दिली जावी. लसीकरणाची क्षमता वाढवून लसीचा ऑप्टिमम युटिलायझेशन वाढवायचं आहे.

2.7 million people were vaccinated on the first day of the vaccination

first day

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात