जवानांवरील हल्ल्याची चिथावणी ममतादीदींच्या सल्ल्यामुळेच, अमित शहांचा हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

कोलकता – केंद्रीय दलाच्या जवानांना घेराव घालावा, असा सल्ला ममता बॅनर्जी यांनी दिल्यामुळेच सीतलकुची येथील घटना घडली, असा आरोप केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केला आहे. मृत्यूच्या प्रकरणातही ममता लांगूलचालनाचे राजकारण करीत आहेत. ममता यांच्या सल्ल्यामुळेच सीआयएसएफ जवानांवर हल्ल्याची लोकांना चिथावणी मिळाली. ममता यांनी असे राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. Amit Shah targets Mamatadidi banerjee

कुचबिहार येथील या घटनेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. नदीया जिल्ह्यातील शांतीपूर येथे अमित शहा यांनी प्रचार फेरी काढली.


ममतादीदी, तुमच्या चिथावणीमुळेच कुचबिहारमध्ये चौघांना प्राण गमवावे लागलेत; पण भाजप कार्यकर्त्याच्या हत्येविषयी तुमचे डोळे नाही पाणावले; अमित शहांचे प्रत्युत्तर

ममता यांनी सात एप्रिल रोजी बनेश्वर येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. शहा यांच्या सांगण्यावरून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान लोकांचा छळ करून त्यांना मारत आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना घेराव घालावा आणि त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवावे. त्यावेळी इतरांनी पटकन मतदान केंद्रात जाऊन मत देऊन यावे, असे त्या म्हणाल्या होत्या.

Amit Shah targets Mamatadidi banerjee


वाचा…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात