पूरग्रस्त भागातील रस्तेदुरुस्तीसाठी नितीन गडकरी यांनी जाहीर केली १०० कोटी रुपयांची मदत


 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील रस्ते दुरुस्तीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात ५२ कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती गडकरी यांनी ट्विटरवरुन दिली.Nitin Gadkari announces Rs 100 crore for road repairs in flood-hit areas OF konkan and Wesrern Maharashtra

राज्यातील विविध विभागात झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. त्यात, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते वाहून गेले आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही माहिती दिली होती. त्यानंतर नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.



राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असून, त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी कळवले होते. गडकरी यांनी या पूराची दखल घेत तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुरामुळे रस्त्यांचे मोठे नुकसानप्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Nitin Gadkari announces Rs 100 crore for road repairs in flood-hit areas OF konkan and Wesrern Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात