पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांमध्ये संताप, आता पर्यायी इंधनांकडे वळावे लागेल, नितीन गडकरी यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

नागपूर : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक विरोध करत आहेत. यामुळे आता आपण पयार्यी इंधनांकडे वळण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.Nitin Gadkari urges people to turn to alternative fuels due to rising petrol and diesel prices

नागपूरमध्ये देशातील पहिल्या एलएनजी पंपाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एलएनजीमध्ये ट्रक, बस कन्हवर्ट करण्यासाठी १० लाख रुपयांचा खर्च आहे. सरासरी या वाहनांचे वषार्चे रनिंग हे ९८ हजार किमी आहे. यामुळे एलएनजी कन्व्हर्ट केलेले असल्यास वर्षाला तुमचे ११ लाख रुपये वाचणार आहेत.



डिझेलमुळे तुमचा खर्चा जास्त होत आहे. हा खर्च ३५ टक्यांवर येणार असून ६५ टक्के फायदा राहणार आहे. एलएनजीमध्ये केलेली गुंतवणूक ही २९५ दिवसांतच भरून निघणार आहे. पुढे फायदाच फायदा असेल.नागपूरमध्ये एलएनजी भरला की ते वाहन ८०० किमी चालणार आहे.

यामुळे मुंबई, हैदराबाद सारख्या शहरांना जाताना येताना एलएनजी पंप उभारावे लागणार आहेत. असे केल्यास वाहतूकीचा खर्च कमी होणार असून डिझेलवरील सरकारचे तसेत वाहन मालकाचे पैसे वाचणार आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले, वाहन निर्मात्या कंपन्या ज्या भारतात वाहने विकतात त्यांच्या फ्लेक्स इंजिन असेलेल्या गाड्या कॅनडासारख्या देशांमध्ये आहेत.

त्या कंपन्यांना भारतातही फ्लेक्स इंजिनचा पर्याय देण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. हा निर्णय येत्या तीन महिन्यांत घेण्यात येईल. यात मोठे काही नाही, एक छोटा पार्ट बदलायचा आहे, आणि इंजिनमध्ये थोडे बदल करायचे आहेत. मग हे इंजिन इथेनॉलवर देखील चालणार आहे. या वाहनांच्या किंमती आणि पेट्रोल वाहनांच्या किंमतीत मोठा फरक नाहीय, असेही गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari urges people to turn to alternative fuels due to rising petrol and diesel prices

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात