झायडस कॅडीला लस लवकरच उपलब्ध होणार, आरोग्यमंत्री राजेश भूषण यांनी गुरूवारी जाहीर केले


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री भूषण यांनी गुरूवारी जाहीर केले की, झायडस कॅडीला ही कोरोना व्हॅक्सिनचा लवकरच राष्ट्रीय व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये समाविष्ट करण्यात येईल. 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ही लस नागरिकांना उपलब्ध करून दिली जावी असा विचार केंद्र सरकार द्वारा केला जात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Zydus cadila  Covid-19 Vaccine will be part of national vaccination program : union health minister rajesh bhushan

अहमदाबादमधील झायडस कॅडिला या कंपनीद्वारे या लसीची  निर्मिती केली गेली आहे. बऱ्याच दिवसांपासून या लसीला मान्यता मिळावी या संबंधी सर्व स्तरातून मागणी होत होती. ही लस आता अधिकृतपणे सर्वत्र उपलब्ध होणार आहे. वय वर्षे 12 ते 18 या वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकार झायडस कंपनीसोबत चर्चा करत असल्याचे देखील आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी यावेळी सांगितले.


Zydus Cadila च्या कोरोना लसीला या आठवड्यात मिळू शकते आपत्कालीन वापराची मंजुरी, गेल्या महिन्यातच दिला होता डेटा


प्लासमिड डीएनए टेक्नॉलॉजीजद्वारे बनवली जाणारी ही व्हॅक्सीन तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. प्रत्येक डोसमध्ये 28 दिवसांत गॅप असणार आहे. असे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी यावेळी सांगितले आहे.

झायडस कॅडिला द्वारे बनवली गेलेली ही पहिलीच डीएनए लस असणार आहे. रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी SARS-CoV-2 चे स्पाइक प्रोटीन या लसीमुळे शरीरात तयार केले जाते. ही लस इंजेक्शन द्वारे दिली जाणार नसून इन्ट्राडर्मल  इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. इंटर्न इंजेक्शन म्हणजे त्वचेच्या वरच्या भागामध्ये सुपरफिशिअल लस देणे. लवकरच या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये ही लस सर्वांना उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

Zydus cadila  Covid-19 Vaccine will be part of national vaccination program : union health minister rajesh bhushan

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात