योगीच राहणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ; संघटना आणि मंत्रिमंडळात फेरबदलाची चिन्हं!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. राजधानी लखनऊपासून ते नवी दिल्लीपर्यंत भाजप नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दिल्लीत पोहोचले. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली, ती तासभर चालली. मौर्य यांच्यानंतर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी नड्डा यांची भेट घेतली. चौधरी यांच्याशिवाय नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. त्यांनी तासभर विचारमंथन केले.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि संघटनात्मक मुद्यांवर चर्चा सुरू होती. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, योगी आदित्यनाथ हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही बदल होणार नाही. मात्र, संघटनेत बदल होण्याची शक्यता आहे. योगी मंत्रिमंडळातही बदल होऊ शकतो. मात्र, निर्णयासाठी पुढील चर्चा होणार आहे. संघटनेला आता घाईगडबीत चुका करायच्या नाहीत. संघटनेच्या निवडणुकाही हायकमांडला घ्यायच्या आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, ज्यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा पोटनिवडणूक, राज्यातील पूर आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर अर्थमंत्री सुरेश खन्ना म्हणाले की, बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली. राज्यातील सर्व 10 जागा आम्ही जिंकू. याशिवाय पूर, विकास आणि आगामी निवडणुकांवर चर्चा झाल्याचे स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले. राज्यातील 700 हून अधिक गावे पूरग्रस्त आहेत.

Yogi will remain the Chief Minister of Uttar Pradesh Signs of change in the organization and cabinet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात