नैसर्गिक अथवा अपघाताने अपंगत्व नशीबी आलेल्या दिव्यांगांसाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार लग्नाची भेट देणार आहे. दिव्यांग दांपत्य किंवा दिव्यांगांशी लग्न केल्यावर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.Yogi government will give wedding gift to the disabled, decision to give incentive amount
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : नैसर्गिक अथवा अपघाताने अपंगत्व नशीबी आलेल्या दिव्यांगांसाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार लग्नाची भेट देणार आहे. दिव्यांग दांपत्य किंवा दिव्यांगांशी लग्न केल्यावर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.
दिव्यांग असल्यामुळे अनेकांना लग्न करणे अवघड होते. यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ही योजना आखली आहे. एखाद्या दिव्यांग पुरुषाशी लग्न केल्यास पंधरा हजार भेट दिली जाणार आहे. दिव्यांग महिलेशी लग्न केल्यास २० हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे.
दांपत्यापैकी दोघेही दिव्यांग असल्यास ३५ हजार रुपये दिलेजाणार आहेत. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, विवाहाचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड जमा करावे लागणार आहे.
उत्तर प्रदेशात कोरोना संक्रमण काळात दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या आहेत. दिव्यांगांची नोंदणी करून त्यांच्यासाठी रेशनकार्ड बनविली जाणार आहेत. त्याचबरोबर १८ हजार दिव्यांगांना पेन्शन आणि स्वयंरोगार दिला जाणार आहे.
दर महिन्याला पाचशे रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. दिव्यांगांना नोकरी मिळावी यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजनाच्य माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण संस्थांनी ७० टक्के दिव्यांगांना नोकरी देणे बंधनकार केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App