विशेष प्रतिनिधी
लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्यासारखा खमक्या प्रशासक असेल तर अगदी अखिलेश यादव यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यालाही दहशत बसते हे उघड झाले आहे. सत्तेत असताना दरवर्षी चार पट वाढणारी अखिलेश यादव यांची संपत्ती योगी आदित्यनाथ यांच्या चार वर्षांच्या काळात केवळ १० टक्के वाढली आहे. १० टक्के वाढ ही नैसर्गिक समजली जाते त्यामुळे थोडक्यात चार वर्षांत अखिलेश यांची संपत्ती वाढलेलीच नाही.Yogi Adityanath’s terror to Akhilesh Yadav too, Wealth, which quadrupled while in power, increased by only 10 per cent during the time of Yogi
समाजावादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अखिलेश यांनी २००० साली कन्नौज लोकसभेची पोटनिवडणूक जिंकली होती. २००४ मध्ये ते येथूनच खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यावेळी भरलेल्या उमेदवारी अर्जात अखिलेश यांची संपत्ती दोन कोटी ३१ लाख रुपये होती.
आज त्यांनी करहलमधून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा आपली संपत्ती ४०.४ कोटी रुपये इतकी दाखविली आहे. याचा अर्थ २२ वर्षांत त्यांची संपत्ती १७ पट वाढली आहे. मात्र, यामध्ये एक आश्चर्यकारक बाब आहे. ते सत्तेवर असताना त्यांची संपत्ती चारपट वाढली आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात संपत्ती केवळ १० टक्यांनी वाढली आहे.
२००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविताना अखिलेश यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती २ कोटी ३१ लाख रुपये असल्याचे म्हटले होते. त्यावेळी आपल्या नावावर एकही गाडी नाही असेही त्यांनी नोंदविले हाते. त्यांची पत्नी डिंपल यांच्याकडे २३ लाख रुपयांचे दागिने असल्याचे म्हटले होते.
२००९ मध्ये जेव्हा पुन्हा कन्नौजमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळी प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती ४ कोटी ८५ लाख ८२ हजार असल्याचे म्हटले होते. याचा अर्थ पाच वर्षांत त्यांची संपत्ती दुप्पट झाली होती. या पाच वर्षांत अखिलेश यादव यांच्याकडे १९ लाख रुपये किंमतीची पजेरो आणि डिंपल यांच्याकडे सहा लाख रुपयांची कोरोला कार अ ाली होती. त्याचबरोबर डिंपल यांचे दागिनेही ४६ लाख रुपयांचे झाले होते. त्याचबरोबर आपल्याकडे ८९ हजार रुपयांचा मोबाईल आणि २२ हजार रुपयांची म्युझिक सिस्टिम असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
२०१२ मध्ये अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष विधानसभा निवडणूक जिंकला. त्यामुळे त्यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देऊन विधान परिषदेची निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांची संपत्ती १.८२ पट वाढली. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती ८ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये असल्याचे म्हटले होते.
त्याचबरोबर आपले भाऊ प्रतीक यादव यांना एक कोटी रुपये उधार दिल्याचेही म्हटले होते. डिंपल यांच्याकडे ५९ लाख रुपयांची संपत्ती झाली होती. २०१७ ची विधानसभा निवडणूक अखिलेश लढले नाहीत. त्यांनी २०१९ मध्ये आझमगढमधून खासदारकीची निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्या संपत्तीत ४.२७ पट वाढ झाली होती. संपत्ती ३७ कोटी ७८ लाख रुपयांची झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App