वृत्तसंस्था
कोलकाता : सिलिगुडीतील प्राणी संग्रहालयातल्या सिंह आणि सिंहिणीच्या नावावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या वादात कोलकता हायकोर्टाने ममता बॅनर्जी सरकारला चांगलेच फटकारले. सिंहाचे नाव अकबर आणि सिंहिणीचे नाव सीता हे ताबडतोब बदला. अनावश्यक वाद वाढवू नका, अशा स्पष्ट शब्दांमध्ये न्यायमूर्ती सोबत भट्टाचार्य यांनी बंगाल सरकारला सुनावले.why to Drow controversy By naming Lions after sita and akbar SC suggest Bengal Govt to change names of big cats
सिलिगुडीतील प्राणी संग्रहालयात सिंह आधीपासूनच होता. त्याचे नाव अकबर होते. पण त्रिपुरातील प्राणीसंग्रहालयातून एक सिंहीण आणून ती सिलिगुडीच्या संग्रहालयात ठेवली. तेव्हा बंगाल सरकारच्या वनविभागाने तिचे नाव सीता ठेवले. त्यामुळे हा वाद उसळला आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक शाखेने कोलकता हायकोर्टात अर्ज दाखल केला. पश्चिम बंगालचे सरकार प्राण्यांच्या नामकरण अनावश्यक हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करत आहे, असा आरोप त्या अर्जात होता.
त्यावर कोलकता हायकोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. ते न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी ऐकून घेतले आणि पश्चिम बंगाल सरकारला सिंह आणि सिंहिणीचे नाव बदलण्याचे आदेश दिले. कोणत्याही प्राण्याचे नाव कोणत्याही समाजातल्या पूज्य देवतांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या अथवा इस्लामच्या पैगंबरांच्या अथवा इसाई देवतांच्या नावाने कसे काय ठेवू शकता??, असा परखड सवाल न्यायमूर्तींनी केला.
त्यावर ममता बॅनर्जी सरकारच्या वकिलांनी नावांचे समर्थन केले. सिंह आधीपासूनच सिलिगुडीतील प्राणी संग्रहालयात होता. त्याचे नाव आधीपासूनच अकबर ठेवले होते. त्रिपुरातल्या प्राणीसंग्रहालयात सिंहिण होती. तिचे नाव आधीपासूनच सीता असे होते. त्यामुळे बंगाल सरकारने नाव बदलले नाही, असा युक्तिवाद ममता सरकारच्या वकिलांनी केला. मात्र त्यावर न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी सरकारला संवेदनशील विषय समजत नाहीत का??, अनावश्यक वाद वाढवण्याचे कारण काय आहे??, कल्याणकारी राज्यात असे वाद अपेक्षित आहेत का??, असे परखड सवाल करून सिंह आणि सिंहिणीचे नाव ताबडतोब बदलण्याचे तोंडी आदेश दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App