वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वैष्णोदेवी मंदिरात 2022च्या पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीमागे काही तरुणांमधील वाद हे या भीषण दुर्घटनेचे कारण ठरले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेट क्रमांक तीनवर काही तरुणांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर काहींना धक्काबुक्की करण्यात आली आणि यादरम्यान लोक पळू लागले. या वादातून चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात १४ जण जखमी झाले असून, त्यांना वैष्णोदेवी नारायणा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशिवाय जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनीही तरुणांच्या वादाला चेंगराचेंगरीचे कारण म्हटले आहे. ते म्हणाले की, दर्शनासाठी लाईव्हमध्ये गुंतलेल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले, ‘ही अत्यंत खेदाची बाब आहे. रात्री अडीचच्या सुमारास गेट क्रमांक 3 येथे ही घटना घडली. रांगेतील काही लोकांमध्ये वादावादी झाली, त्यानंतर हाणामारी झाली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे काम सुरू झाले. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने येतात.
#UPDATE | "I’m immediately rushing to Katra to take stock of the situation arising out of the tragedy at Mata Vaishno Devi Shrine," tweets Union Minister Dr Jitendra Singh pic.twitter.com/kABkwmmynJ — ANI (@ANI) January 1, 2022
#UPDATE | "I’m immediately rushing to Katra to take stock of the situation arising out of the tragedy at Mata Vaishno Devi Shrine," tweets Union Minister Dr Jitendra Singh pic.twitter.com/kABkwmmynJ
— ANI (@ANI) January 1, 2022
घटनेनंतर काही काळ दर्शन थांबवण्यात आले होते, मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ते म्हणाले की मी निघालो आहे आणि वैष्णोदेवी पोहोचत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तेथे मोठी गर्दी झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दर्शनासाठी जाणाऱ्या आणि दर्शन घेऊन निघणाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. वाटेत कुठेही त्यांची स्लिप तपासली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आणि देवस्थानाच्या बोर्डाच्या कर्मचाऱ्यांची कमतरता होती.
वैष्णो देवी मंदिर परिसराचे अधिकारी जगदेव सिंह यांनी सांगितले की, मृतांपैकी एक जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील रहिवासी आहे. याशिवाय अन्य 11 लोक देशातील विविध राज्यांतील आहेत. मृतांमध्ये आतापर्यंत 7 जणांची ओळख पटली आहे. अन्य ५ जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, नववर्षाच्या पूर्वसंध्येला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे 70 ते 80 हजार भाविक पूजेसाठी मंदिरात पोहोचले होते. एका स्थानिक दुकानदाराने सांगितले की, श्राइन बोर्डाने भाविकांची संख्या निश्चित केलेली नाही. ते म्हणाले की, त्रिकुटा टेकडीवर जास्त भाविक राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना कटरा बेस कॅम्पवर थांबवून आपली मर्यादा निश्चित करायला हवी होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App