Jaishankar : पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना का मिठी मारली? युक्रेनमध्ये विचारलेल्या प्रश्नाला जयशंकर यांनी दिले हे उत्तर

Jaishankar

वृत्तसंस्था

कीव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी (  Narendra Modi ) शुक्रवारी त्यांच्या एक दिवसीय युक्रेन दौऱ्यावर राजधानी कीव्हमध्ये होते. या ऐतिहासिक दौऱ्यावर पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान एक क्षण असा आला जेव्हा पीएम मोदींनी झेलेन्स्की यांना मिठी मारली. दोन्ही नेत्यांच्या या सप्रेम भेटीची सर्वत्र चर्चा होत आहे.

पंतप्रधान मोदींच्या या भेटीनंतर परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मॉस्कोमध्ये मिठी मारल्याबद्दल प्रश्न विचारला. ज्याला परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर देताना म्हटले की, ‘आमच्या इथे जेव्हा लोक एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांना मिठी मारतात. तो तुमच्या संस्कृतीचा भाग नसला तरी आमच्या संस्कृतीचा भाग आहे.”



पीएम मोदींचा युक्रेन दौरा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर सहा आठवड्यांनंतर होत आहे, ज्यावर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जोरदार टीका केली होती. 8 जुलै रोजी ज्या दिवशी पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर मॉस्कोला पोहोचले, त्याच दिवशी रशियाने युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर हल्ला केला होता.

या हल्ल्यात लहान मुलांसह 41 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर जेव्हा पीएम मोदींनी पुतीन यांना मिठी मारल्याचे चित्र समोर आले तेव्हा युक्रेनसह पाश्चात्य देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने मॉस्कोच्या खुनी गुन्हेगाराला आलिंगन दिल्याचे पाहून निराशाजनक असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.

या संदर्भात माध्यमांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना हा प्रश्न विचारला होता. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील ही भेट धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे, विशेषत: अशा वेळी जेव्हा जागतिक भू-राजकारणात झपाट्याने बदल होत आहेत. या संभाषणाचा उद्देश केवळ दोन्ही देशांमधील आर्थिक आणि संरक्षण सहकार्याला चालना देणे नाही तर जागतिक स्तरावर दोन्ही देशांची भूमिका मजबूत करणे हा आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संभाषण सकारात्मक असल्याचे सांगितले आणि भविष्यात भारत आणि युक्रेनमधील संबंध अधिक दृढ होतील असे सांगितले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीचा दोन्ही देशांना फायदा होणार आहे.

Why did PM Modi hug Putin? Jaishankar gave this answer to a question asked in Ukraine

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात