काश्मीरमधून पंडितांनी पलायन केले त्यावेळी केंद्रात कुणाचे सरकार होते? काँग्रेस आणि भाजपचे एकमेकांकडे बोट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जानेवारी १९९० मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यासाठी मजबूर केले गेले त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचे सरकार होते आणि त्याला भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती. Whose government was at the Center when Pandits fled from Kashmir? Congress and BJP point fingers at each other

द काश्मीर फाईल्स सिनेमा सध्या चर्चेत आहे. त्याला कारण राजकीयही आहे आणि सिनेमाची मांडणीही. सिनेमा म्हणून तो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला आहे पण सोबतच त्याचे राजकारणही केले जाते आहे हेही वास्तव आहे. राजकारणाच्या या चिखलफेकीत काही आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावेही केले जात आहेत.



सोशल मीडियावर अपुऱ्या माहितीचा पूर आलेला दिसतो. काँग्रेसचे नेते काश्मीरी पंडितांच्या पलायनाला भाजपला जबाबदार धरत आहेत, तर भाजपचे नेते काँग्रेसच्या धोरणांकडे बोट दाखवत आहेत. काँग्रेस नेते दिग्विजयसिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, भाजपला जाऊन विचारा असा सल्ला सवालकर्त्याना केलाय. पण काश्मीरी पंडितांनी काश्मीर सोडलं त्यावेळेस तिथे नेमके कुणाचे सरकार होते? कोण राज्यपाल होते?, कुणाच्या पाठिंब्यावर होते? असे सगळे प्रश्न पुन्हा चर्चेत आहेत. दिग्विजयसिंग यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी भाजपाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे दिग्विजयसिंग यांची पोस्ट?

विवेक अग्निहोत्रींचा’ द काश्मीर फाईल्स’ सिनेमा पाहिल्यानंतर बाहेर पडणारा प्रेक्षकांचा एक वर्ग झूंडगिरीवर येताना दिसतो. सिनेमात जे दाखवले आहे, त्यात ऐतिहासिक तथ्य किती हे तपासण्याची तसदीही घेताना दिसत नाही. त्यामुळे वास्तवाची मोडतोड होते. एक वातावरण निर्मिती केली जाते की काश्मीरी पंडितांना घरदार सोडावे लागले त्याला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार आहे. सेक्युलर धोरणे जबाबदार आहेत.

दिग्विजयसिंग यांनी त्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न सोशल पोस्टमधून केला. त्यांच्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘जानेवारी 1990 मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यासाठी असाह्य केले गेले त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचं सरकार होते आणि त्याला भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती. जगमोहन हे राज्यपाल होते ज्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला. आता तुम्ही सवाल भाजपला करा’. विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपयी, व्ही.पी.सिंग आणि लालकृष्ण अडवाणी असे तिघे एकत्र बसल्याचा फोटोही दिग्विजयसिंगांनी पोस्ट केला आहे.

वीरेंद्र पाल यांची पोस्ट

दिग्विजयसिंग यांनी अशी भाजपला कोंडीत पकडणारी पोस्ट केली वीरेंद्र पाल यांनी दिग्विजयसिगांना उत्तर देताना, त्या दोन दिवसात काय झाले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते म्हणतात- १८ आणि १९ तारखेला हत्याकांड झालं. १८ तारखेलाच फारुख अब्दुल्लांनी राजीनामा दिला. त्यांचे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर टिकलेले होते. मुफ्ती मोहम्मद सईद देशाचे गृहमंत्री होते. मुफ्ती मोहम्मद सईद आणि काँग्रेसचे हे षडयंत्र होते की, कुठल्याही सरकारशिवाय ही घटना पूर्णत्वाला न्यायची. तोपर्यंत जगमोहन यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता. त्याच दरम्यान ही घटना पूर्ण केली गेली. जगमोहन यांनी कारभार हाती घेईपर्यंत ही घटना पूर्ण झाली होती.

Whose government was at the Center when Pandits fled from  Kashmir? Congress and BJP point fingers at each other

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात