ज्याच्यावर केसेस जास्त, त्याचे हिंदुत्व श्रेष्ठ!!; व्वा रे हिंदुत्वाची शिलेदार चुलत भावंडे!!


हिंदुत्वाला राजकीय दृष्ट्या देशात केंद्रस्थान मिळाल्यापासून हिंदुत्वाची नवी – नवी व्याख्या सांगणारे व्याख्याकर्ते उदयाला आले आहेत. हिंदुत्ववादासाठी या व्याख्याकर्त्यांचे कर्तृत्व तर अजिबात नाही किंवा फार मर्यादित आहे. त्यातही महाराष्ट्रातील दोन चुलत भावंडे स्वतःचेच हिंदुत्व खरे असे सांगत दुसऱ्याच पक्षांच्या वळचणीला गेले आहेत आणि तेथून एकमेकांच्या वर हिंदुत्वाचा फैरी झाडत आहेत!! Whoever has more cases, his Hindutva is superior

– खस्ता सावरकर, हेडगेवारांनी खाल्ल्यात

या दोन्ही चुलत भावंडांनी हिंदुत्वाच्या नव्या व्याख्या करताना “ज्याच्यावर केसेस जास्त, त्याचे हिंदुत्व श्रेष्ठ!!” असा जावई शोध लावला आहे. जरा हिंदुत्वाला राजकीयदृष्ट्या बरे दिवस आल्यानंतर हिंदुत्ववादी पक्षांमध्ये भांडणे लावून घेण्याची अशी या नेत्यांना अवदसा आठवली आहे. हिंदुत्वासाठी खस्ता खाल्ल्या सावरकरांनी, हेडगेवारांनी, बाळासाहेबांनी, अटलजींनी, अडवाणींनी आणि आता या नेत्यांच्या खस्तांवर राजकीय मस्ती करत आहेत, त्यांचेच अनुयायी!!

हिंदुत्ववादी दिग्गजांच्या या अनुयायांना एवढी मस्ती आली आहे की दबा धरून बसलेले तथाकथित नेहरूवादी धर्मनिरपेक्ष पक्ष यांना दिसत नाहीत. त्यांना भारतीय राजकारणातील कायमचे उखडण्याचे त्यांच्या स्वप्नातही येत नाही पण एकमेकांचे गळे धरायला मात्र हे हिंदुत्ववादी नेते कमी करत नाहीत.– केसेस टाकल्या कोणी??

ज्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना तुमचे कसले हिंदुत्व??, एक तरी केस तुमच्यावर आहे का??, असा सवाल केला. त्या राज ठाकरे यांच्या पक्षावर आणि स्वतः राज ठाकरे यांच्यावर केसेस कोणी टाकल्या?? उद्धव ठाकरे यांच्या सरकारने किंवा त्या आधीच्या काँग्रेस सरकारांनीच ना?? उद्धव ठाकरे यांचे सरकार तरी कोणाच्या पाठिंब्यावर तरले आहे?? पवार आणि काँग्रेसच्याच ना??…मग हिंदुत्ववादी चुलत भावांना एकमेकांशी जुळवून घेता येत नाही?? एकमेकांशी जुळवून घेतले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना ते महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या उखडून फेकू शकतील हे देखील त्यांना कळत नाही का??

– राष्ट्रवादी पेक्षा शिवसेना टार्गेटवर

जे महाराष्ट्रातल्या दोन चुलत भावांचे तेच केंद्रातल्या मोदी – शहा जोडगोळीचे मोदी – शहा यांना प्रादेशिक पक्षांची घराणेशाही संपवायची आहे. हेतू तर निश्चितच योग्य आहे. पण ही प्रादेशिक पक्षांची घराणेशाही संपवताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी ऐवजी ते शिवसेनेला अधिक टार्गेट करतात हे लक्षात येत नाही का?? शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, या साठी मोदी – शहा यांच्या शिक्कामोर्तबची गरज आहे का??

– अटलजी अडवाणींचे कष्ट का विसरता??

मोदी – शहा हे दोन्ही नेते आज जरी यशस्वी असले तरी त्यांच्या यशाची पार्श्वभूमी अटलजी, अडवाणींच्या अथक कष्टामध्ये आहे आणि त्यांना बाळासाहेबांचा पाठिंबा होता हे विसरून चालणार नाही!! मोदी – शहा हे स्वकर्तृत्वाने जितके मोठे झाले तितकेच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या कर्तृत्वाने भाजपचे नेतेही मोठे झाले ही वस्तुस्थिती नाही का??

तथाकथित धर्मनिरपेक्ष पाया उखडून टाका ना

अशावेळी काँग्रेससह बाकीच्या धर्मनिरपेक्ष पक्षांचा राजकीय पाया उखडून टाकण्याऐवजी हिंदुत्ववादी पक्षच एकमेकांमध्ये जीवघेणे भांडतात… “ज्याच्यावर केसेस जास्त त्याचे हिंदुत्व श्रेष्ठ” अशी पाजळतात तेव्हा हिंदुत्ववादी मतदारांनी त्यांना कशाप्रकारे धडा शिकवला पाहिजे?? काँग्रेस-राष्ट्रवादी सारखे घराणेशाही जोपासणारी पक्ष घात लावून बसलेच आहेत. त्यांच्या जाळ्यात हिंदुत्ववादी मतदारांना अडकवून टाकण्याचा हिंदुत्ववादी नेत्यांचा डाव आहे का?? हा डाव यशस्वी झाला तर हिंदुत्ववादी पक्ष पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या भूमिकेत यायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात हाच प्रयोग गेली 2.5 वर्षे सुरू आहे. हे मोदी – शहा नावाच्या सध्या यशस्वी असलेले जोडगोळीला कळत नाही का??, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे “ज्याच्यावर केसेस जास्त त्याचे हिंदुत्व श्रेष्ठ!!” असली वेडगळ आणि बाष्कळ हिंदुत्वाची व्याख्या करण्यापेक्षा या केसेस कोणी टाकल्या हे उघडून डोळे नीट पहा!! म्हणजे डोक्यात थोडा प्रकाश पडेल!!

– जनमत आळवावरचे पाणी

जनमत हे आळवावरचे पाणी असते. आज मोदी – शहा हे दोन्ही हिंदुत्ववादी नेते आज प्रबळ असतीलही. पण जनतेच्या बळावर ते प्रबळ आहेत जनतेने पायाखालचे जाजम काढून घेतले, तर त्यांची किंमत किती उरेल??, हे विसरता कामा नये आहे. त्यामुळे सध्याच्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या कर्तृत्वशून्य व्याख्येतून असले हिंदुत्व नसलेले बरे असे म्हणायची वेळ हिंदुत्ववादी मतदारांवर येऊन ठेपली नाही म्हणजे मिळवली!!

Whoever has more cases, his Hindutva is superior

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात