प्रतिनिधी
पुणे : राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर आणि ठाण्यातल्या उत्तर सभेनंतर त्यांना फारसे महत्त्व देऊ नका, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्धा तासाची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. पण आज मात्र राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या भाषणावर, “त्यांच्यावर बोलून मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही”, असे एकच वाक्य सांगून शरद पवार निघून गेले. I don’t want to increase the importance by talking about them !!; Sharad Pawar’s says
पिंपरी-चिंचवड मध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांच्या प्रश्नाला एकाच वाक्यात उत्तर देऊन शरद पवार बाहेर पडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्री संदर्भात आदित्य ठाकरे यांनी परवा एक वक्तव्य केले होते. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांच्या मित्राबरोबर शिवसेना आघाडीत आली हे बाळासाहेबांना आवडले असते, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत जोरदार चढाई केली. पवारांच्या मैत्रीची दुहाई देऊन शिवसेना बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवत आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. राज ठाकरे यांनी “क्रेडिबिलिटी” या शब्दावर जोर दिला होता.
राज ठाकरे यांच्या या भाषणावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, ‘त्यांच्यावर बोलून मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही”, एवढेच बोलून पवार तिथून निघून गेले. मात्र पवारांनी राज ठाकरे यांच्या आधीच्या दोन भाषणानंतर अर्धा तास प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या आरोपांना उत्तरे दिली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App