प्रतिनिधी
नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्युरोप रंगले होते. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावरूनच नानांना टोला लगावला आहे. If the NCP’s dagger is so bloody, get out of power; Ramdas Athavale to Nana Patole
तसेही हे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. नाना पटोले म्हणतात राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला आहे. राष्ट्रवादीच्या खंजीरमुळे काँग्रेस एवढी रक्तबंबाळ झाली असेल तर त्यांनी राष्ट्रवादी सोबत राहू नये. हिंमत असेल तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे. काँग्रेसने पाठिंबा काढल्यास सरकार पडेल आणि आम्ही आमचे सरकार कधी बनवतोय याची आम्ही वाटच बघतोय. हे सरकार पडल्यास सरकार बनवण्याची आमची ताकद आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
– फडणवीस अधिक कार्यक्षम
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा फडणवीस चांगले काम करू शकतात. उद्धव ठाकरे हे चांगले आहेत. पण ते काँग्रेस – राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात ते अडकले आहेत. त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेता येत नाहीत. यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीत यावे. शिवसैनिकांचीही हीच इच्छा आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. पण ते ठाम असतील तर आमचीही तयारी आहेच. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत, असे आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App