देवेंद्र फडणवीसांवर कारवाईचा इशारा देताना दिलीप वळसे पाटलांच्या विधानांमध्ये विसंगती; मंत्र्याच्या ओएसडीच्या फोनबाबत मात्र “कानावर हात”


प्रतिनिधी

मुंबई : रेमसेडिवीर इंजेक्शन पुरवठ्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले असताना ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाईचा इशारा देऊन बसले, पण त्याचवेळी त्यांनी विसंगत विधानेही केल्याने सरकारचीच पंचाइत झाली आहे.dilip valse patil makes contradictory statements regarding remdisivir

एकीकडे पोलीसांच्या चौकशीत हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असा इशारा वळसे पाटलांनी दिला, त्याचवेळी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्यामुळे सोडण्यात आलेले नसून त्याने परवानगीचे पत्र दाखवल्याने सोडण्यात आल्याचे वळसे-पाटील म्हणाले. त्यांच्या विधानातून विसंगतीच बाहेर आली. शिवाय रेमसेडिवीरचा साठा पोलिसांनी जप्त केलेला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.



ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे पोलिसांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले, त्याचवेळी कोणत्यातरी मंत्र्याच्या ओएसडीने धमकी दिल्याचे देखील आपल्याला माहीत नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

पोलीसांनी या सगळ्या प्रकरणावर पत्रक काढून खुलासा केला. त्यात कुठेही फडणवीसांनी हस्तक्षेप केल्याचे नमूद नाही. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या विधानांमध्ये मात्र विसंगती आहे. त्यांनी याबाबत वेगळी भाषा वापरली. ते म्हणाले, की पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत.

त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलीस स्टेशनमध्ये बोलावले असता, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि त्यांचे अन्य सहाकारी त्या ठिकाणी पोहचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यक्तीला या ठिकाणी का आणि कशासाठी बोलावले आहे.

जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढेच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव आणणे हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.

dilip valse patil makes contradictory statements regarding remdisivir

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात