एकीकडे मोदी घेताहेत नारीशक्ती सभा; दुसरीकडे INDI अलायन्स मध्ये चाललेय एकमेकांचे पाय ओढा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नव्या संसदेत पहिले विधेयक म्हणून 33% महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष कामाला लागले आहेत. त्यांनी नारीशक्ती सभांचा देशभर धडका लावला आहे, पण दुसरीकडे INDI अलायन्सच्या नेत्यांचे मात्र एकमेकांचे पाय ओढणे चालू झाले आहे!! While PM Modi concentrate on narishakti samelans, INDI alliance leaders are engaged in dragging each other’s feet

आता हेच पहा ना :

संसदेत नारीशक्ती विधेयक मंजूर होताच पंतप्रधान मोदींनी जयपूर मध्ये 25 सप्टेंबर रोजी पहिली नारीशक्ती सभा घेतली. त्यानंतर गुजरात दौऱ्यावर येऊन त्यांनी अहमदाबाद आणि वडोदरा येथे तशाच नारीशक्ती सभा घेतल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 50 % जास्त महिला उपस्थित असतील याची काळजी घेतली. 33% महिला आरक्षण विधेयकाचा पूर्ण राजकीय लाभ उठवण्याची ही दमदार पावले मोदींनी सुरुवातीपासून टाकायला सुरुवात केली आहे.

पण त्याचवेळी दुसरीकडे INDI अलायन्सचे नेते मात्र एकमेकांचे पाय ओढायला लागले आहेत. INDI अलायन्सच्या नेत्यांनी सुरुवातीला पाटणा, बंगलोर आणि मुंबईत तीन महाबैठका घेऊन सुरुवात तर चांगली केली. के काँग्रेसने नेते के. सी. वेणूगोपाल यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय समितीची बैठकही घेतली.

पण त्यानंतर मात्र INDI आघाडीतल्या नेत्यांनी एकमेकांचे पाय ओढायला सुरुवात केली. याची सुरुवात कम्युनिस्टांनी केली. कम्युनिस्टंनी राहुल गांधींना वायनाड सोडून भाजपशासित राज्यातला दुसऱ्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची सूचना केली. दरम्यानच्या काळात शरद पवार गौतम अदानींना भेटून आले. त्यांच्या घरी मुक्काम ठोकला आणि त्यांच्याबरोबर एका कारखान्याचे उद्घाटन करून ते मुंबईला परतले.

पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसचे नेते तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांवर शरसंधान साधत आहेत, तर समाजवादी पार्टीचे नेते मध्य प्रदेशातली निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे मनसुबे राखत मध्य प्रदेश दौऱ्यावर आले आहेत. पश्चिम बंगाल मध्ये डेंगीची जोरदार साथ आहे. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हवापालटासाठी पार्ट्यांसाठी स्पेनला गेल्याची टीका लोकसभेतले गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी मुर्शिदाबादेतल्या पत्रकार परिषदेत केली. बंगाल मधले एकापाठोपाठ एक जिल्हे डेंगीच्या सपाट्यात येत आहेत आणि ममता बॅनर्जी हवापालटासाठी परदेश दौरा करून दिवसाला 300000 रुपये भाडे असलेल्या महालात राहत आहेत. मध्यंतरी त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्या लवकर बऱ्या होवून भारतात परत येवोत, अशा “सदिच्छा” देखील अधीर रंजन चौधरी यांनी दिल्या.

दुसरीकडे मध्य प्रदेशात समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादवांनी INDI अलायनसची भाषा तोंडी बोलली, पण प्रत्यक्षात ते मध्य प्रदेशात गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा लढवण्याची घोषणाही करून बसले. 2018 मध्ये समाजवादी पार्टीने 50 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी एक आमदार निवडून आला 2023 च्या निवडणुकीत आम्ही जास्त उमेदवार उभे करू, असे त्यांनी भोपाळ मध्ये विमानतळावर उतरल्यावर लगेच पत्रकारांना सांगितले. INDI अलायन्स मधल्या घटक पक्षाशी म्हणजे काँग्रेसशी आम्ही चर्चा करू, पण निवडणूक मात्र सायकल चिन्हावरच लढवू, असा इशारा त्यांनी दिला.

आता मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 234 पैकी 50 जागा जर काँग्रेसने समाजवादी पार्टीसाठी सोडल्या, तर उरलेल्या फक्त 184 जागांवर निवडणूक लढवून काँग्रेस भाजपची टक्कर घेऊन बहुमत मिळवू शकेल का?? असा यानिमित्ताने सवाल तयार झाला आहे.

पण एकूण पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस ममता बॅनर्जींशी, केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसशी आणि मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी काँग्रेसशी पंगा घेण्याच्या बेतात आहेत, याची झलकच यातून दिसून आली. एकीकडे मोदी 33% आरक्षणाचा राजकीय लाभ मिळवण्यासाठी नारीशक्ती संमेलने भरवत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी चार्ज करत आहेत आणि दुसरीकडे INDI अलायन्सचे नेते मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकमेकांविरोधातच उभे ठाकत असल्याचे यातून स्पष्ट होते.

While PM Modi concentrate on narishakti samelans, INDI alliance leaders are engaged in dragging each other’s feet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात