Skill Development Scam : चंद्राबाबू नायडू यांना तूर्तास सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही


चंद्राबाबू नायडू यांना ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सध्या तरी दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढील आठवड्यात पुढे ढकलण्यात आली आहे. Skill Development Scam  Chandrababu Naidu has no relief from the Supreme Court at present

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांनी या सुनावणीतून स्वतःला अलिप्त केले आहे. नायडू यांनी एफआयआर आणि रिमांडच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले. नायडू यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली होती. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी एफआयआर आणि रिमांड आदेश रद्द करण्याची त्यांची याचिका फेटाळली होती.

कौशल्य विकास घोटाळ्यात आंध्र प्रदेश सीआयडीने नायडू यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान देत चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. चंद्राबाबूंना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १७ (ए) लागू होते, असे सीआयडीच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

पण नायडू यांच्या याचिकेत एसीबी कोर्टाने दिलेला रिमांड रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून चंद्राबाबू नायडू यांना ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे 300 कोटी रुपयांचे नुकसान  झाल्याचा आरोप आहे.

Skill Development Scam  Chandrababu Naidu has no relief from the Supreme Court at present

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात