”काँग्रेसचा नव्याने आलेला एवढा पुळका दाखवताना आपल्या पक्षाची…” भाजपाचा संजय राऊतांवर पलटवार!


भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर  दिले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस पक्ष हा गंजलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे. काँग्रेसने त्यांचा ठेका दुसऱ्यांना दिला आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. खरंतर या टीकेला काँग्रेसकडून प्रत्युत्तर येणं स्वाभाविक होतं.  परंतु  ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय  राऊत यांनी मोदींच्या या विधानावरून  भाजपावर टीकी केली. या टीकेला आता भाजपाने जोरदार  प्रत्युत्तर दिले आहे. Keshav Upaadhye has responded to MP Sanjay Rauts criticism of BJP

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की,  60 वर्ष देशावर सत्ता असताना, हवी तशी लूटमार, भ्रष्टाचार करून स्वतःची पोटं भरणाऱ्या काँग्रेसच्या ‘टेस्ट इंडिया कंपनीला’ 2014 साली जनतेनं बाजूला फेकून दिलं. आज 10 वर्षं भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्यामुळे –

11 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले गेले आहे.

जगाचा आर्थिक विकास दर 2.7% असताना भारताचा सर्वाधिक 7.8% आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहे

15000 किलोमीटर चे नवीन रस्ते झाले आहेत.

10 कोटी गरीब लोकांना आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार करता येत आहेत

80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्यात येत आहे

कोरोनाच्या महामारीत मोफत लसीकरण करून 27 देशांना लस पुरवली आहे

करोडो लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरासाठी अडीच लाख रुपयांची मदत केली आहे.

आणि अशा विविध योजनांमधून कोट्यवधी शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार यांचे राहणीमान उंचावले आहे. काँग्रेसचा नव्याने आलेला एवढा पुळका दाखवताना आपल्या पक्षाची उभी हयात त्यांच्या विरोधात गेली, हे विसरू नका.

याचबरोबर मोदी-शहा आणि भाजपचे सरकार ‘बेस्ट इंडिया’ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चर्चेत राहण्यासाठी तुमच्या सारखी ‘वेस्ट’ बडबड करण्याची कोणाला आवड आणि गरज दोन्ही नाहीये. असं केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

भाजपावर काय केली होती टीका? –

काँग्रेस हा पक्ष गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय? ईस्ट इंडिया कंपनी जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात