हुसैन सध्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांना मंगळवारी (२६ सप्टेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. BJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai
लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हुसैन सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत.
हुसैन यांना याआधी ऑगस्टमध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.
कोण आहेत शाहनवाज हुसैन? –
भाजप नेते शाहनवाज हुसेन यांचा जन्म 12 डिसेंबर 1968 रोजी बिहारमधील सुपौल येथे झाला. सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. हुसेन हे नितीशकुमार आणि एनडीए सरकारमध्ये उद्योगमंत्री होते, पण नंतर सरकार पडले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App