सीबीआयची टीम तपासासाठी दाखल
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक बुधवारी (२७ सप्टेंबर) विशेष विमानाने इंफाळला पोहोचले. या टीमचे नेतृत्व एजन्सीचे विशेष संचालक अजय भटनागर करत आहेत. Manipur Violence Tension increased in Manipur after the photo of two students bodies went viral
वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अगोदर मणिपूरमधील इंफाळमधील सीएम सचिवालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या मोइरांगखोम येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या दोन तरुणांच्या अपहरण आणि हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थी सहभागी झाले होते. बेपत्ता तरुणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या घोषणा देत विद्यार्थी मुख्यमंत्री बिरेन एन सिंह यांच्या बंगल्याकडे जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्याचवेळी रॅलीचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते लांथेंगबा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या दोन तरुणांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. “दोन्ही तरुणांच्या मारेकऱ्यांना २४ तासांच्या आत अटक करावी आणि त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणावेत, अशी आमची मागणी आहे,”
विद्यार्थी नेत्याने सांगितले की, “आम्हाला आमच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे. आमच्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची निर्घृण हत्या केली जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमचे शिक्षण कसे सुरू ठेवणार.”
विद्यार्थ्यांचा राग शांत करण्यासाठी पोलिसांनी जाहीर केले की विद्यार्थी प्रतिनिधींना मुख्यमंत्री आणि राज्यपाल या दोघांनाही भेटण्याची परवानगी देण्याची व्यवस्था करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती अचानक बिघडली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App