विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : महाराष्ट्रात दहीहंडी सणावर आणि गणेशोत्सवावर बंदी घातली जात आहे. मात्र, ओडिशा सरकारने धाडसी निर्णय घेत पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे दरवाजे आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने नवीन गाइडलाइन्सं जाहीर केली असून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत प्रत्येक भाविकाला दर्शन देण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे.While Dahihandi is banned in Maharashtra, Jagannath temple in Puri is open for devotees
पुरीतील जगन्नाथ मंदिर २३ ऑगस्टपासून खुले करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी प्रशासनातर्फे वेळ निश्चित करण्यात आला आहे. सकाळी सात वाजल्या पासून ते रात्री सात वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे.
यापुर्वी ११ ऑ गस्ट रोजी मंदिरा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सूचनेत सांगण्यात आले होते की, मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यासाठी मुख्य प्रशासक डॉ. कृष्ण कुमार यांनी अध्यक्षांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुलं करण्याबाबत विस्तृत स्वरुपात चर्चा करण्यात आली. तसेच या चर्चेत कोरोना नियमांबाबत देखील बातचीत करण्यात आल्याचे समजतेय.
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे 24 एप्रिल पासून श्री जगन्नाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते. तसेच मंदिर पुन्हा सुरू करण्यासाठी जाहीर केलेली गाईडलाइन्स अंतर्गत भाविंकासाठी मंदिर प्रमुख सण,उत्सवाच्या दिवशी बंद करण्यात येणार आहे. राज्याबाहेरील भाविकांना 96 तासाच्या आत आरटी पीसीआर टेस्ट आणि कोव्हिड वॅक्सिन सर्टीफिकेट दाखवावे लागणार आहे. तरच मंदिरात प्रवेश दिला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App